
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे चांगले वाढताना दिसत आहेत. आता हे भाव चांगलेच आपटले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

सध्या इराणविरोधात सुरु असलेले इस्त्रायल आणि अमेरिकेचे युद्ध चांगलेच पेटले आहे. दोन्ही देशांचा बदला घेण्यासाठी इराणने आखाती देशांमधील अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ माजली. यामुळे सोने आणि चांदीच्या दरावर देखील परिणाम झाला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 5 हजार 800 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 24 हजारांची घसरण झाली आहे.

10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 66 हजार 860 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 79 हजार 130 रुपयांवर आले आहेत.

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम सोन्या आणि चांदीच्या दरावर होत आहे. आजचे घसरलेले दर हे सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.