Todays Gold Rate: पुन्हा सोने आणि चांदीचे भाव धडाम! एकाच दिवसात दुसऱ्यांदा घसरण झाल्यानंतर 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या दरात दुसऱ्यांदा घसरण झाली आहे. ही बाब ग्राहकांना दिलासा देणारी आहे. आता दुसऱ्यांदा घसरण झाल्यानंतर सोन्याचे दर किती झाले आहेत? चला जाणून घेऊया...

आजचा दसऱ्याच्या मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांचा सोने चांदी खरेदीकडे कल पहायला मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव वाढ झाल्याने मुहूर्त साधताना गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तरीही आज एका दिवसात सोन्याच्या दरात दुसऱ्यांदा घसरण झाली आहे.
जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे जर सोने आणि चांदी खरेदी करण्याचा जर विचार असेल तर आजचा दिवस हा चांगला आहे.
सोन्याच्या दरात एका दिवसात दोनदा घसरण झाली आहे. पहिली घसरण 500 रुपयांची झाली. त्यानंतर पुन्हा एका तासात 1 हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 49 हजार 865 रुपयांवर पोहोचले आहेत.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात पण दोन वेळा घसरण झाली. सुरुवातीला 3 हजार आणि नंतर 5 हजारांची घसरण झाली. त्यामुळे आज एक किलो चांदीचे दर हे जीएसटीसह 2 लाख 16 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)