Todays Gold Rate: आता नेमकं काय करावं? सोन्याचा भाव 4 हजारांनी तर चांदी 11 हजारांनी घसरली

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव आकाशाल स्पर्श करताना दिसत होते. मात्र, आता अचानक सोने आणि चांदीचे भाव चांगलेच असरले असल्याचे चित्र आहे. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घ्या...

| Updated on: Jun 10, 2026 | 3:28 PM
1 / 5
सर्वसामान्यांसाठी आज एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असणारे सोने आणि चांदीचे भाव हे आज चांगलेच घसरले आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा खूप चांगला आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार...

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड आनंद झाला आहे. ज्यांना सोने खरेदी करण्याची इच्छा होती त्यांना खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.

3 / 5

आज सोन्याच्या दारात तब्बल 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 11 हजार रुपयांनी घसरण झाले आहे. अमेरिका इराण यांच्यातल्या युद्धासंदर्भातल्या सुरू झालेल्या घडामोडीमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याची सराफ व्यावसायिक माहिती.

4 / 5

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटी सह 1 लाख 51 हजार 410 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटी सह 2 लाख 45 हजार 140 रुपये द्यावे लागणार आहेत.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us