Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे दर 5 हजार 500 रुपयांनी घसरले, आजचा भाव काय?

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे दर हे चांगलेच घसरत असल्याचे चित्र दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्या...

| Updated on: Jun 08, 2026 | 2:53 PM
1 / 5
गेले दोन दिवस हे सर्वसामान्यांना दिलासा देणार आहेत. कारण या दोन दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ही घसरण पाहिल्यानंतर ज्यांना सोने खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

गेले दोन दिवस हे सर्वसामान्यांना दिलासा देणार आहेत. कारण या दोन दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ही घसरण पाहिल्यानंतर ज्यांना सोने खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 4 हजारांची घसरण झाली आहे.

3 / 5

आज, 8 जून रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 53 हजार 985 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर आले आहेत.

4 / 5

दोन दिवसात सोन्याच्या दरात 5 हजार 500 रुपयांची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही 15 हजारांची घसरण झाली आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us