Todays Gold Rate: सोन्याचा भाव कोसळला! थेट 6000 रुपयांची घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत सोन्याच्या दरतात घसरण होत असल्याचे चित्र आहे. आज देखील सोन्याचा भाव घसरला आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव किती आहे...

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व आहे. पण सतत वाढत असलेल्या भावांमुळे ते खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी कठीण झाले आहे. मात्र, गेल्या तीन चार दिवसांपासून सोन्याच्या दरात जवळपास 6000 रुपयांची घसरण झाली आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे.

जळगावच्या सराफ बाजारात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत असल्याचे दिसत आहे. अनुक्रमे तीन हजार आणि दोन हजार तिनशे रुपयांची घसरण झाली आहे. आज देखील सोन्याचे भाव घसरल्यामुळे एकूणच जवळपास 6000 रुपयांची घसरण झाली आहे.

31 ऑगस्ट रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजारांची आणि चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांलाठी ही दिलासादायक बातमी आहे.

आता 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपये झाले आहेत.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)