Todays Gold Rate: सोन्याचा भाव चांगलाच घसरला! सर्वसामान्यांसाठी खरेदी करण्याचा चांगला दिवस
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत असलेल्या सोन्याच्या भावात आता चांगलीच घसरण झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घ्या...

भारतीय संस्कृतीमध्ये सोने या मौल्यवान धातूला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. भारतात सणासुदीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या किंमती पाहून सर्वसामान्यांसाठी ते न परवडणारे झाले होते. पण आज सोन्याचे दर चांगलेच घसरले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीचे दर सतत वाढताना दिसत होते. मात्र, आज जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

आज, 7 एप्रिल रोजी सोन्याच्या भावात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

जळगाव सुवर्णनगरीत आज १० ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटी सह 1 लाख 51 हजार 616 रुपयांवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे चांदीचे भाव जीएसटी सह 2 लाख 42 हजार 50 रुपयांवर आले आहेत. इज्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सोन्या आणि चांदीच्या दरावर परिणाम कायम आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)