Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 13 मे 2023, या राशीच्या लोकांना गुंतवणूक फायद्याची ठरेल
मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेषः नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढती व बदली होण्याचे योग आहेत. व्यवसाय रोजगारात मोठेपणाचा आव आणू नका. व्यापारात स्पर्धकांच्या चुकीचा नकळत फायदा होईल. व्यापारात वाढ होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. शासकीय योजनेतून लाभ घडेल. कौटुंबिक सौख्य राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.

वृषभ: आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. साहित्यिक समारंभात सहभाग घ्याल. नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. शासकीय सेवेतील व्यक्तींनी सरळमार्गी मिळणाऱ्या पैशाला महत्व द्यावे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांची आरोग्याची तक्रार निर्माण होईल. वैवाहिक जीवनात क्षमाशील राहणे सर्वोत्तम ठरेल. आज प्रवास सुखकर होईल. प्रवासातून लाभ होईल. संतती बद्दल समाधान व्यक्त कराल.

मिथुन: मनाची चलबिचल वाढेल. व्यापारात देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध राहा. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविदाचे प्रसंग टाळा. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. कलाक्षेत्रात केलेल्या कामाचे चीज होणार नाही. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्भवतील. वाहन चालविताना खबरदारी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळा. शत्रुपक्ष वरचढ होतील. कलह टाळावेत.

कर्क: कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली मनासारखी होईल. नव्या संधीचा फायदा होईल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील. पत्नी जोडदार नोकरीत असेल तर बढतीचे योग आहेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील.आरोग्य ठीक राहणार आहे.

सिंह: हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांच्या गाठीभेती होतील. त्यातून आकस्मिक लाभाची शक्यता आहे. अपघात भय संभवते.

कन्या: आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. मुलाची प्रगती आपल्याला आनंद देईल. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. परदेश भ्रमणाचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील. दूरच्या प्रवासातून लाभ होतील. व्यसनापासून दूर रहा. दुरवरचे प्रवास घडतील.

तुळ: व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. आपसातील वाढ समजदारीने मिटवा. प्रापर्टी खरेदीचा योग आहे. आर्थिक बाबतीत मध्यम स्वरुपाचा दिवस आहे. भावडांशी वादविवाद टाळा. विद्यार्थ्यानी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. सामाजिक कार्यक्रम साहित्यिक चळवळ व्यासपीठ इत्यादी माध्यमातून आपला नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.

वृश्चिकः प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. व्यापारात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. लाभदायक दिवस आहे. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

धनु: नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणि मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे.

मकर: घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहील. आपल्या महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. मनस्वास्थ सांभाळा. सकारात्मक विचार ठेवा.

कुंभ: व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. यश व उत्साह वाढणार आहेसंकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थीवर्गाची विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील. आपल्या व्यसनांवर आवर घाला. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

मीन: व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहील. आपल्या इच्छा महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा टाळा. व्यावसायिक यश मिळाल्याने आनंदी राहाल.