1 November New Rule : गॅस सिलिंडर ते टॅक्स रिफंड, 3 मोठ्या निमयांत 1 नोव्हेंबरपासून महत्त्वाचे बदल, तुमच्या खिशाला…
आता नोव्हेंबर हा नवा महिना सुरू झाला आहे. या नव्या महिन्यात तुमच्या शिखावर परिणाम करणारे अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे हे नियम नेमके काय आहेत, ते जाणून घेऊ या...

आता नोव्हेंबर हा नवा महिना सुरू झाला आहे. या नव्या महिन्यात तुमच्या शिखावर परिणाम करणारे अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे हे नियम नेमके काय आहेत, ते जाणून घेऊ या...
येत्या 1 नोव्हेंबर रोजीपासून जीएसटी काऊन्सीलने रिटर्न फयलिंग आणि रिफंडची प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे व्यावसायिकांना टॅक्स नोटीस तसेच रिफंडच्या बाबत दिलासा मिळणार आहे. जीएसटी रिफंडचे ऑटोमेटेड अप्रुव्हल 1 नोव्हेंबर रोजीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरचा भाव बदलण्याची शक्यता आहे. शासकीय तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीवर विचार विनिमय करतात आणि गॅस सिलिंडरचा नवा दर जाहीर करतात.
गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे या महिन्यात गॅस सिलिंडरचा भाव नेमका काय असणार, घरगुती गॅस सिलिंडरच्या भावात वाढ होते की काय, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे.
पेंन्शनर्सना प्रत्येक वर्षाला जीवन प्रमाणपत्र द्यावे लागते. 80 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांना पेंशनर 1 नोव्हेंबरपासून आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतात. हे सर्टिफिकेट जमा न केल्यास मिळणारे पेन्शन थांबवले जाते. लाईफ सर्टिफिकेट जमा केल्यास पेन्शन चालू राहते.