Tukaram Mundhe: स्वत: IAS अधिकारी पण मुलांना… तुकाराम मुंढेंचे मोठे विधान

Tukaram Mundhe: सध्या राज्यात बेधक कारवाईसाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. त्यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी मोठे विधान केले आहे.

| Updated on: Oct 25, 2026 | 8:25 AM
1 / 6
देशभरातील असंख्य तरुण आणि त्यांचे पालक यूपीएससी परीक्षेतून ‘सिव्हिल सर्व्हिस’मध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र महाराष्ट्रातील धाडसी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकतेच याबाबत एक वेगळेच मत मांडले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, ते आपल्या मुलांना कधीही आयएएस किंवा आयपीएस अधिकारी होण्याचा सल्ला देणार नाहीत.

देशभरातील असंख्य तरुण आणि त्यांचे पालक यूपीएससी परीक्षेतून ‘सिव्हिल सर्व्हिस’मध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र महाराष्ट्रातील धाडसी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकतेच याबाबत एक वेगळेच मत मांडले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, ते आपल्या मुलांना कधीही आयएएस किंवा आयपीएस अधिकारी होण्याचा सल्ला देणार नाहीत.

2 / 6

तुकाराम मुंढे हे त्यांच्या निर्भीड कामगिरी आणि राजकीय दबावापुढे न झुकण्याच्या स्वभावासाठी ओळखले जातात. याच कणखर भूमिकेमुळे त्यांना वारंवार राजकीय रोष सहन करावा लागला. परिणामी, त्यांच्या २१ वर्षांच्या सेवेत तब्बल २५ वेळा बदली झाली. एका सनदी अधिकाऱ्याची बदली केवळ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात होत नाही; तिचा थेट आणि गंभीर परिणाम त्याच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. मुंढे यांच्या बाबतीतही नेमके हेच घडले.

3 / 6

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी कुटुंबाच्या या संघर्षाचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, त्यांचा मुलगा पाचवीत येईपर्यंत त्याला सहा वेळा शाळा बदलावी लागली होती. वारंवार नवीन शहर, घर आणि शाळा बदलल्यामुळे मुलांचे बालपणीचे मित्र सुटतात, शैक्षणिक प्रगती बाधित होते आणि संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक वेळी शून्यापासून आयुष्य पुन्हा उभे करावे लागते.

4 / 6

केवळ मुलेच नव्हे, तर त्यांच्या पत्नीलाही पतीच्या प्रत्येक नवीन पोस्टिंगनुसार आपले वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्य पूर्णपणे पुनर्रचित करावे लागले. आजच्या तरुणांकडे देश आणि समाज बदलण्यासाठी केवळ सरकारी नोकरी किंवा प्रशासकीय सेवा हाच एकमेव मार्ग उरलेला नाही, असे मुंढे यांचे स्पष्ट मत आहे.

5 / 6

तुकाराम मुंढे यांच्या मते, व्यवसाय, स्टार्टअप्स, उद्योजकता आणि स्वतंत्र सार्वजनिक नेतृत्व या माध्यमांतून तरुणांना अधिक स्वातंत्र्य मिळते. स्वतःचे निर्णय घेणे, धोरणे राबवणे आणि सामाजिक समस्या सोडवणे यात प्रशासकीय नोकरीच्या अनेक मर्यादा आणि बंधनांपेक्षा उद्योजकतेमध्ये जास्त मोकळीक असते. सरकारी सेवेत येणाऱ्या राजकीय व प्रशासकीय मर्यादांमुळे अनेकदा प्रामाणिक अधिकारीही हतबल होतात, असा त्यांचा रोख आहे.

6 / 6

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळखले जातात. सध्या ते महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. या पदावर रुजू झाल्यापासून त्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध आक्रमक आणि धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us