तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय, समोसा, वडा नाहीच, थेट फळेच..
तुकाराम मुंढे तूफान चर्चेत आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या हातात कारभार घेतल्यापासून त्यांनी धमाकेदार कामगिरी केली. लोकांमध्ये त्यांची प्रचंड चर्चा आहे. त्यातच आता त्यांनी मोठा निर्णय घेतला.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ खोरांची पार वाट लावली. राज्यभरात कारवाया केल्या जात आहेत. इतक्या वर्षात कधी जेवढ्या कारवाया झाल्या नाहीत, तेवढ्या आता केल्या जात आहेत.

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून होणाऱ्या कारवाया पाहून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलची क्रेझ चांगलीच वाढली आहे. लोक त्यांचे प्रचंड काैतुक करत आहेत.

अन्नाची गुणवत्ता अत्यंत महत्वाची असते,हे त्यांनी अनेकदा सांगितले. दरवेळी कोणताही शासकीय कार्यक्रमात नाष्टात वडापाव,समोसा,चीप्स असे पदार्थ दिली जातात. पण यावेळी कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात संत्र,सफरचंद, केळी असे देण्यात आले.

जंकफूट न देता कर्मचाऱ्यांना नाश्त्यात फळे देण्याचा निर्णय तुकाराम मुंढे यांनी घेतला.हा मोठा निर्णय घेण्यात आला.यासोबतच पुढच्याही होणाऱ्या कार्यक्रमात नाश्त्यात जंडफूड ऐवजी कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप होणार असल्याचेही स्पष्ट झाले.

यासोबतच तुकाराम मुंढे यांनी अनेक मुलाखतीमध्ये बोलताना स्पष्ट केले की,मी बाहेरचे अन्न अजिबात खात नाही,मी घरगुती जेवणावर अधिक भर देतो.तेही साधे जेवण घेतो.