Jennifer Winget: दुसऱ्या लग्नानंतर जेनिफरच्या हळदीचे Unseen फोटो, खास क्षण समोर
Jennifer Winget Haldi Ceremony : टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट हिने दुसऱ्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हळदीचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने फ्रेंडशिपडेचं निमित्त साधत हळदीचे फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जेनिफर हिच्या हळदीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट हिने 16 जुलै 2026 रोजी नव्या आयुष्याची सुरुवात केली. सिंगापूर येथील उद्योजकासोबत अभिनेत्रीने लग्न केलं आहे. जेनिफर हिच्या दुसऱ्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सामिल होते... लग्नाच्या काही दिवसांनंतर अभिनेत्रीने हळदीचे फोटो पोस्ट केलेत.

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने जेनिफरने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने आपल्या जवळच्या मित्रांसोबत घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांची झलक दाखवली. या फोटोंमध्ये करण वाही, हरलीन सेठी आणि इतरजण हळदीच्या समारंभाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत.

जेनिफर विंगेटने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये धमाल-मस्ती, नृत्य आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण दिसून येत आहे. प्रत्येक फोटोमध्ये लग्नाचा आनंद स्पष्टपणे जाणवतो. हे फोटो पोस्ट करण्यासोबतच, जेनिफरने कॅप्शनमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी एक मनापासून लिहिलेली पोस्टही शेअर केली आहे.

जेनिफर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता करण ग्रोव्हर याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर वयाच्या 42 व्या वर्षी दुसरा संसार थाटला आहे. घटस्फोटानंतर तब्बल 12 वर्षांनी जेनिफर हिने दुसरं लग्न केलं...

जेनिफर विंगेटचं पहिलं लग्न अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत झालं होतं. ‘दिल मिल गये’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर त्या दोघांची भेट झाली. एकत्र काम करत असताना त्यांचं प्रेम फुललं आणि लवकरच ते लग्नबंधनात अजकले. 2012 साली त्यांचा विवाह झाला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.