Twinkle Khanna: ट्विंकल खन्ना जुन्या कपड्यांचे काय करते? ‘नो रिपिट क्लोथ’वर स्पष्टच बोलली
Twinkle Khanna: अभिनेत्री म्हटलं की त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हजारो कपडे असतात. एकदा घातलेले कपडे अभिनेत्री क्वचितच कुठे पुन्हा घालताना दिसतात. मग कपाटातील जुन्या कपड्यांचे त्या काय करतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. ट्विंकल खन्ना काय करते वाचा...

बॉलिवूड अभिनेत्री या कायमच त्यांच्या ग्लॅमरल लूक आणि लग्झरी लूकने सर्वांचे लक्ष वेधत असतात. त्या लाखो रुपये खर्च करुन लूक करतात. महागातले कपडे, ज्वेलरी खरेदी करतात. पण तुम्ही एखाद्या अभिनेत्रीचा लूक रिपिट झाल्याचे पाहिले का? नाही ना.. अनेकदा चाहत्यांच्या मनात प्रश्न येतो की अभिनेत्री त्यांच्या कपाटातील जुन्या कपड्यांचे काय करतात. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखिका आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तसेच तिची आकर्षक जीवनशैली देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा एकदम नवा आणि वेगळा लूक दिसून येतो.
स्वतःला ‘आळशी खरेदीदार’ म्हणवून घेणाऱ्या ट्विंकलने सांगितले की, नवीन कपडे विकत घेण्याऐवजी त्यांनी कपाटात आधीच असलेल्या कपड्यांची जुळवाजुळव करून एक स्टायलिश आणि ताजा लूक तयार केला आहे. एक सेलिब्रिटी असूनही असा निर्णय घेतल्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.
ट्विंकल खन्नाने अभिनेत्री शेफाली शाहसोबतचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शेफाली शाहशी संवाद साधताना दिसत आहे. हा व्हिडीओ ‘ट्वीक इंडिया बुक’ने आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात ट्विंकलने कपाटातील जुन्या कपड्यांसोबत ती काय करते हे सांगितले आहे.
आपल्या पेहरावाबद्दल ट्विंकलने कॅप्शनमध्ये स्पष्टपणे लिहिले की, या कार्यक्रमासाठी तिने काहीही नवीन खरेदी केलेले नाही. त्याऐवजी कपाटात असलेल्या जुन्या कपड्यांची वेगवेगळी जुळणी करून त्यांनी आकर्षक लूक साकारला. ती मिश्किल शैलीत म्हणाली की, “मला खरेदी करायला कंटाळा येतो. जर एकाच कपड्याचे डझनभर वेगवेगळे प्रकार वापरता आले, तर मी खूप आनंदी असते.”