Photo | रविवारचा वेळ कुटुंबासोबत, पाहा उर्मिला-जिजाचे काही खास फोटो!

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट असते.
- मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट असते.
- विविध ठिकाणी गेल्यानंतर ती फोटो काढून सोशल मीडिया अकाऊंट्सवर पोस्ट करत असते.
- उर्मिला कोठारेने आज रविवारच्या दिवशी सुट्टीचा आनंद कुटुंबासोबत घेतला. या फोटोत तिची लहानशी मुलगी जिजा देखील दिसत आहे. सशांसोबत काही फोटो तिने काढले आहेत.
- आपल्या हातांवर कुठलासा पक्षी दाखवत उर्मिला पक्षाबद्दलची माहिती जिजाला देताना दिसत आहे. जिजादेखील कुतुहलाने आईकडून माहिती ऐकत आहे.
- पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडेमध्ये तिने हे फोटो काढले आहेत. तसं तिने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मेंशन केलं आहे.





