थेट चिखलात उतरून हा अभिनेता करतोय शेती, 430 कोटींच्या संपतीचा आहे मालक

430 कोटींची मालक ज्याने आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये दिलेत अनेक सुपरहिट चित्रपट. पण आता शेतात करतोय काम. थेट चिखलात उतरून करतोय शेती. कोण आहे तो?

| Updated on: Sep 06, 2026 | 3:58 PM
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे आपला निवांत वेळ घालवण्यासाठी आपल्या गावी किंवा आवडीच्या ठिकाणी भेट देत असतात. असाच एक अभिनेता ज्याचे सध्या शेतात काम करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे आपला निवांत वेळ घालवण्यासाठी आपल्या गावी किंवा आवडीच्या ठिकाणी भेट देत असतात. असाच एक अभिनेता ज्याचे सध्या शेतात काम करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.

2 / 5

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या आपल्या नव्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. ऑगस्ट 2026 मध्ये स्वतःची शेतीची जमीन खरेदी केल्यानंतर आता वरुणने प्रत्यक्ष शेती करण्यास सुरुवात केली आहे.

3 / 5

अभिनेत्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून, त्यामध्ये तो चक्क शेतात उतरून भाताची लागवड करताना आणि फावड्याने माती उकरताना दिसत आहे.

4 / 5

वरुणने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर करत ‘खेती शुरू’ असे कॅप्शन दिले आहे. फोटोंमध्ये तो एका साथीदारासोबत शेतात काम करताना दिसत आहे. तो पूर्णपणे शेतीच्या कामात रमल्याचे दिसून येत आहे.

5 / 5

वरुणच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही चाहत्यांनी त्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us