‘आश्रम’सारखेच दमदार डार्क थ्रिलर सीरिज; वीकेंड ‘बिंज-वॉच’साठी सेव्ह करून घ्या यादी
जर तुम्हाला ओटीटीवर बॉबी देओलची वेब सीरिज 'आश्रम' आवडली असेल आणि तशाच पद्धतीचा कंटेंट पहायचा असेल तर, ओटीटीवर काही इतरही डार्क थ्रिलरचे पर्याय उपलब्ध आहेत. हे कोणते, ते पहा..

एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'आश्रम' ही वेब सीरिज जर तुम्हाला आवडली असेल, तर ओटीटीवर तशाच प्रकारच्या इतर अनेक उत्तम सीरिज उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक सोनी लिव्हवर स्ट्रीम होत असून 'अनदेखी' असं या सीरिजचं नाव आहे. प्रभावशाली आणि शक्तिशाली लोक कायद्याला कसं आपल्या खिशात ठेवतात आणि गुन्हे लपवण्यासाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात, याची कथा यात पहायला मिळते.

'दहन: राकन का रहस्य' ही सीरिज जियो हॉटस्टारवर उपलब्ध आहे. अंधविश्वास आणि रहस्य यांवर आधारित या सीरिजची कथा असून 'आश्रम'सारखीच ही एक डार्क थ्रिलर आहे. आधुनिक विचारांशी मतभेद, जुन्या समजुती आणि अंधश्रद्धा यांची ही कथा आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द रेलवे मेन' ही वेब सीरिज स्ट्रीम होत आहे. भोपाळमधील गॅस दुर्घटनेवर आधारित ही सीरिज भ्रष्ट व्यवस्था कशा पद्धतीने सामान्य लोकांचे जीव धोक्यात आणते, यावर प्रकाश टाकते.

प्राइम व्हिडीओवरील 'पाताल लोक' हीसुद्धा तशाच थीमची अत्यंत लोकप्रिय वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये भारतीय समाज, राजकारण आणि भ्रष्ट व्यवस्थेच्या कटू सत्याला अधोरेखित करण्यात आलं आहे. एका गुन्हेगारी तपासाच्या माध्यमातून समाजाचे विविध स्तर यात दाखवण्यात आले आहेत.

जियो हॉटस्टरवरील 'असुर' ही पौराणिक आणि सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. भारतीय पौराणिक कथा, सायकोलॉजी आणि एडव्हान्स क्राइम यांचं अनोखं समीकरण तुम्हाला थक्क करेल. सस्पेन्सची आवड असणाऱ्यांसाठी ही सीरिज मस्ट वॉच आहे.