गणेशोत्सवासाठी मुंबईत कुठे कराल शॉपिंग? बाप्पाच्या सजावटीपासून पूजेच्या साहित्यापर्यंत, ही आहेत खरेदीची भन्नाट ठिकाणं

गणेशोत्सवाच्या आधी बाजारात गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे शक्य असल्यास खरेदीची यादी आधी तयार करून सकाळच्या वेळेत बाजार गाठा. वस्तूंच्या किमतींची तुलना करा आणि सजावटीसोबतच पर्यावरणपूरक पर्यायांनाही प्राधान्य द्या. बाप्पाच्या स्वागतासाठी महागड्या वस्तूंपेक्षा कल्पक सजावट आणि मनापासून केलेली तयारी अधिक खास ठरते.

| Updated on: Sep 02, 2026 | 3:22 PM
1 / 7
Ganeshotsav: गणेशोत्सव म्हटलं की मुंबईच्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते. घराघरांत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते आणि त्यासोबतच सजावट, फुलं, पूजेचं साहित्य, रोषणाई, तोरणं आणि नैवेद्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदीही सुरू होते. मुंबईत गणपतीच्या खरेदीसाठी मोठमोठ्या बाजारपेठांपासून छोट्या गल्लीतील दुकानांपर्यंत अनेक पर्याय आहेत.

Ganeshotsav: गणेशोत्सव म्हटलं की मुंबईच्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते. घराघरांत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते आणि त्यासोबतच सजावट, फुलं, पूजेचं साहित्य, रोषणाई, तोरणं आणि नैवेद्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदीही सुरू होते. मुंबईत गणपतीच्या खरेदीसाठी मोठमोठ्या बाजारपेठांपासून छोट्या गल्लीतील दुकानांपर्यंत अनेक पर्याय आहेत.

2 / 7

दादर फूल मार्केट- गणपतीच्या सजावटीत फुलांना विशेष महत्त्व असतं. त्यासाठी दादरचं फूल मार्केट हा उत्तम पर्याय आहे. झेंडू, गुलाब, कमळ, शेवंती यांसारखी विविध फुलं आणि हार इथं मिळतात. फुलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करायची असल्यास सकाळच्या वेळेत जाणं फायदेशीर ठरू शकतं.

3 / 7

क्रॉफर्ड मार्केट अर्थात महात्मा ज्योतिबा फुले मंडई हे मुंबईतील प्रसिद्ध बाजारांपैकी एक आहे. गणेशोत्सवासाठी सजावटीच्या वस्तू, फुलं, पूजेच्या वस्तू, ड्रायफ्रूट्स आणि इतर घरगुती साहित्य घेण्यासाठी हा परिसर उपयोगी ठरतो. विविध दुकानांमध्ये वस्तूंची तुलना करून खरेदी करता येते.

4 / 7

भुलेश्वर मार्केट- गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करायची असेल तर भुलेश्वर परिसरात अनेक पर्याय मिळतात. पूजा साहित्य, घंटा, तोरणं, सजावटीच्या वस्तू, बांगड्या आणि विविध धार्मिक वस्तूंसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. या भागात धार्मिक साहित्याच्या दुकानांचे अनेक पर्याय आहेत.

5 / 7

लोहार चाळ- गणपतीच्या मंडपाला आकर्षक लूक द्यायचा असेल तर लाइट्स, इलेक्ट्रिक डेकोरेशन, हँगिंग्स आणि इतर सजावटीच्या वस्तूंसाठी लोहा चाळ परिसर पाहता येतो. कमी बजेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई आणि डेकोरेशन साहित्य शोधणाऱ्यांसाठी हा भाग उपयोगी ठरू शकतो.

6 / 7

लालबाग- गणेशोत्सव आणि लालबाग यांचं नातं मुंबईकरांसाठी खास आहे. लालबाग मार्केट परिसरात उत्सवाच्या काळात खरेदीसह गणपतीचा माहोल अनुभवता येतो. सजावटीच्या वस्तू, पूजेचं साहित्य आणि विविध उत्सवी वस्तूंसाठी परिसरातील दुकाने पाहता येतात.

7 / 7

दक्षिण मुंबईत जाणं शक्य नसेल तर दादर, सांताक्रूझ आणि विलेपार्ले परिसरातील स्थानिक बाजारही उपयोगी ठरतात. विशेषतः घरगुती गणपतीसाठी लागणारे दिवे, फुलं, कापड, क्राफ्ट साहित्य आणि सजावटीच्या छोट्या वस्तू स्थानिक बाजारात सहज मिळू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us