Aishwarya Rai’s Brother: ऐश्वर्या रायचा सख्खा भाऊ कोण? मर्चंट नेव्हीत केलंय काम, सुंदर दिसते बायको

Aishwarya Rai brother: रक्षाबंधननिमित्त ऐश्वर्या राय आणि आराध्याचे फोटो व्हायरल झाल्यापासून अभिनेत्रीचं कुटुंब पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. ऐश्वर्याचा भाऊ कोण आहे, तो काय करतो.. याविषयी जाणून घ्या..

| Updated on: Sep 02, 2026 | 1:44 PM
1 / 6
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनविश्वातील मोठं नाव आहे. मात्र तिचं कुटुंब कायमच प्रसिद्धीपासून काहीसं दूर राहिलं आहे. ऐश्वर्याचा मोठा भाऊ आदित्य रायबद्दलही फारशी चर्चा होत नाही. नुकत्याच समोर आलेल्या काही कौटुंबिक फोटोंमुळे आदित्य राय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनविश्वातील मोठं नाव आहे. मात्र तिचं कुटुंब कायमच प्रसिद्धीपासून काहीसं दूर राहिलं आहे. ऐश्वर्याचा मोठा भाऊ आदित्य रायबद्दलही फारशी चर्चा होत नाही. नुकत्याच समोर आलेल्या काही कौटुंबिक फोटोंमुळे आदित्य राय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

2 / 6

आदित्य रायने त्याचं आयुष्य बॉलिवूडच्या झगमगाटापेक्षा वेगळ्या क्षेत्रात घडवलं. तो मर्चंट नेव्हीमध्ये इंजीनिअर म्हणून काम करत होता. बहिण ऐश्वर्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल बनत असताना आदित्यने मात्र त्याची व्यावसायिक ओळख आणि खासगी आयुष्य जपण्याला प्राधान्य दिलं.

3 / 6

आदित्य रायचा बॉलिवूडशी संबंध मात्र पूर्णपणे नाही असं नाही. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल का रिश्ता’ या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी तो एक होता. विशेष म्हणजे या चित्रपटात ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होती. तर आई वृंदा राय यांनीही या चित्रपटाच्या लेखनात सहभाग घेतला होता. म्हणजेच, ऐश्वर्याच्या फिल्मी कारकिर्दीत कुटुंबाचा अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे.

4 / 6

आदित्य रायचं लग्न श्रीमा रायशी झालं आहे. श्रीमा ही सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून सक्रिय आहे. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत—शिवांश आणि विहान. यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त आदित्य आणि श्रीमा यांनी शेअर केलेल्या कौटुंबिक फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं.

5 / 6

या फोटोंमध्ये ऐश्वर्या, तिची मुलगी आराध्या बच्चन, आई वृंदा राय, आदित्य, श्रीमा आणि त्यांची मुलं दिसत आहेत. ऐश्वर्या तिच्या कुटुंबासोबत क्वचितच सार्वजनिक फोटो शेअर करत असल्याने या खासगी क्षणांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला.

6 / 6

ऐश्वर्या राय कितीही मोठी स्टार असली, तरी तिचा भाऊ आदित्य रायने प्रसिद्धीपासून दूर राहून स्वतःचं स्वतंत्र आयुष्य निवडलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us