महिमा चौधरीचा पूर्व पती कोण? फिल्म इंडस्ट्रीपासून दूर शोधलं होतं प्रेम, आता दुसऱ्या लग्नाच्या चर्चा

अभिनेत्री महिमा चौधरीला नवरीच्या रुपात पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अभिनेता संजय मिश्रासोबत ती या लूकमध्ये दिसली होती. परंतु फक्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असा लूक केल्याचं नंतर स्पष्ट झालं. दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे.

| Updated on: Oct 31, 2025 | 3:03 PM
1 / 5
अभिनेत्री महिमा चौधरी ही नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. अभिनेता संजय मिश्रासोबत नुकतेच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यावरून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. परंतु या फोटोंमागचं सत्य वेगळंच आहे. हे दोघं त्यांच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत असल्याचं स्पष्ट झालं.

2 / 5

महिमा चौधरीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिने बॉबी मुखर्जीशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगी आहे. परंतु लग्नाच्या सहा वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला. तेव्हापासून महिमा सिंगलच आहे. तिने 2006 मध्ये बॉबी मुखर्जीशी लग्न केलं होतं.

3 / 5

लग्नाच्या वर्षभरानंतर महिमाने मुलीला जन्म दिला. तर 2013 मध्ये महिमा आणि बॉबी अधिकृतरित्या विभक्त झाले. महिमाच्या पूर्वी पतीविषयी फारशी माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाही. परंतु काही रिपोर्ट्सनुसार तो कोलकातामधील आर्किटेक्स बिझनेसमन आहे.

4 / 5

बॉबी मुखर्जीला लाइमलाइटपासून दूर राहणंच आवडतं. महिमाशी लग्न केल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. परंतु घटस्फोटानंतर तो पुन्हा मीडियाच्या डोळ्यांपासून लांब गेला. बॉबी सध्या त्याच्या बिझनेसमध्ये व्यस्त आहे. मुंबई, दिल्ली आणि मिलान याठिकाणी त्याचे ऑफिसेस आहेत.

5 / 5

जवळपास आठ महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या लिंक्डइन अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने सांगितलं होतं की तो तीन दशकांपेक्षाही जास्त काळापासून काम करतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us