Rekha And Jaya Bhaduri Education: रेखा की जया भादुरी, कोणाचे शिक्षण जास्त? या दोन सुंदर अभिनेत्रींच्या डिग्री विषयी जाणून घ्या

Rekha And Jaya Bhaduri Education: बॉलिवूडच्या दोन सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रेखा आणि जया भादुरी ओळखल्या जातात. पण त्या दोघींपैकी कोण जास्त शिकलेले आहे? असा प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडतो. चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 15, 2025 | 1:01 PM
1 / 6
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच योग्य ते शिक्षण घेतले आहे. पण काही कलाकारांनी मात्र केवळा शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तर काही कलाकारांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयालाच करिअर बनवले. काही फक्त 12वी पास झाले, तर काहींकडे मोठ्या डिग्री आहेत. यामुळेच लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न येतो की चित्रपटातील कलाकार किती शिकलेले आहेत. लोकांना हे जाणून घ्यायचे असते की एखाद्या विशिष्ट कलाकाराने शिक्षण किती झाले आहे.

2 / 6
त्यांच्या आवडत्या कलाकाराचे शिक्षण इतर कलाकारांच्या तुलनेत जास्त आहे की कमी. आज आपण दोन दिग्गज अभिनेत्रींच्या शिक्षणाची तुलना करणार आहोत, ज्यांची नावे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये घेतली जातात. चला, जाणून घेऊया रेखा आणि जया भादुरी यांच्यापैकी कोण जास्त शिकलेली आहे व कोणाकडे कोणत्या डिग्री आहेत.

3 / 6
रेखाचे खरे नाव भानुरेखा गणेशन आहे. तिचा जन्म एका चित्रपट कुटुंबात झाला होता. त्यामुळे लहानपणापासूनच तिचा कल चित्रपटांकडे होता. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले, तर रेखाने तिचे शालेय शिक्षण चेन्नई येथून सुरू केले. मात्र, घरच्या जबाबदाऱ्या आणि चित्रपटांमध्ये लवकर काम सुरू केल्यामुळे ती शिक्षण पुढे वाढवू शकली नाही.

4 / 6
असे म्हटले जाते की रेखाने फक्त प्राथमिक स्तरापर्यंतच शिक्षण घेतले आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिच्या प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर तिने शिक्षणाच्या कमतरतेचा कधीही तिच्या करिअरवर परिणाम होऊ दिला नाही. रेखाने सिद्ध केले की मोठ्या डिग्रीशिवायही मेहनतीने माणूस आपली ओळख निर्माण करू शकतो.

5 / 6
जया भादुरी आज जया बच्चन म्हणून ओळखले जातात. त्या बॉलिवूडमधील सर्वात शिकलेल्या अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण भोपाळ येथून पूर्ण केले आणि त्यानंतर त्या दिल्लीला आल्या. शालेय शिक्षणानंतर त्यांचा कल अभिनयाकडे होता. त्यामुळे त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये प्रवेश घेतला.

6 / 6
जया भादुरी यांनी अभिनयात पदवी प्राप्त केली आणि गोल्ड मेडलही जिंकले. यामुळेच त्यांना चित्रपटांमध्ये खूप लवकर ओळख मिळाली. जया भादुरी या रेखा पेक्षा जास्त शिकल्या आहेत.