Photo : असीम मुनीरसोबत असणारी महिला कोण? संपूर्ण जगात का होतेय चर्चा?

Iran Us Peace Talk : इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर आता करार केला जाणार आहे. याबाबतच्या चर्चेसाठी दोन्ही देशांचे नेते आणि अधिकारी पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी दाखल झाले आहेत. याचे काही फोटो समोर आले आहेत. यातील एका महिलेची जगभरात चर्चा सुरू आहे.

बापू गायकवाड | Updated on: Apr 11, 2026 | 5:17 PM
1 / 5
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानला पोहोचले, तेव्हा विमानतळावर त्यांच्या स्वागतावेळी एक महिला देखील दिसली. या महिलेने असीम मुनीर यांच्यासह जेडी व्हान्स यांचे स्वागत केले.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानला पोहोचले, तेव्हा विमानतळावर त्यांच्या स्वागतावेळी एक महिला देखील दिसली. या महिलेने असीम मुनीर यांच्यासह जेडी व्हान्स यांचे स्वागत केले.

2 / 5

असीम मुनीर यांच्यासोबत दिसणारी ही महिला सामान्य व्यक्ती नसून तिचे नाव नॅटली ए. बेकर आहे. नॅटली सध्या पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासात चार्ज द अफेयर्स (कार्यवाहक राजदूत) म्हणून कार्यरत आहेत.

3 / 5

नॅटली ए. बेकर या एक वरिष्ठ अमेरिकन अधिकारी आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय कूटनीतीचा दीर्घ अनुभव आहे. पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे अधिकृत राजदूत नसल्याने त्या चार्ज द’अफेयर्स म्हणून दूतावासाचे नेतृत्व करत आहेत.

4 / 5

नॅटली अमेरिका-पाकिस्तान संबंध व्यवस्थापित करणे, धोरणात्मक चर्चांना पुढे नेणे आणि उच्चस्तरीय बैठकींचे समन्वयन करणे यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडतात. अशा मोठ्या कूटनीतिक भेटींमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

5 / 5

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत जेडी व्हान्स, आसिम मुनीर आणि इसाक डार यांच्यासोबत नॅटली बेकर यांची उपस्थिती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. विमानतळावर दिसलेले हे दृश्य केवळ स्वागतापुरते मर्यादित नसून, त्यामागे कूटनीती, धोरण आणि जागतिक राजकारणाचा मोठा संदेश दडलेला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us