
हिंदू धर्मात जप करण्याला फार महत्त्व आहे. जप केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळते तसेच तुमची इंद्रिये जागृत राहतात, असे मानले जाते. पण जप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जपमाळेत 108 एवढेच मणी का असतात, याचा कधी विचार केला आहे का? याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या...

शास्त्रांमध्ये जपमाळेत 108 मणी असण्याची वेगवेगळी कारणं देण्यात आलेली आहे. काही जण 27 मणी असलेली जपमाळ वापरतात तर काही जण 54 मणी असलेल्या जपमाळेच्या मदतीने जप करतात.

ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशी आणि 9 गृह यांचा गुणांक हा 108 असतो. हा अंक संपूर्ण जगात घडणाऱ्या घडामोडींचे प्रतिनिधित्त्व करतो, असे मानले जाते. अनेकजण 100 मणी स्वत:साठी तर उरलेले 8 मणी हे आपल्या गुरुचे असतात, असे म्हटले जाते. त्यामुळेच अनेकजण 108 मणी असलेली जपमाळ वापरतात.

काही लोकांच्या मते दिवसात आपण 24 तासांच्या चक्रात 21,600 वेळा देवाच्या नावाचे स्मरण केले पाहिजे. 108 मण्याची जपमाळ असेल आणि तुम्ही 200 माळा पूर्ण होईपर्यंत जप केला तर तुम्ही 21600 वेळा मंत्र म्हटले असे गृहित धरले जाते. त्यामुळेच जपमाळ ही 108 मण्यांची असते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.