
क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण झालं आहे. सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सचिन याचा हा पुतळा २२ फूट उंच असून यामधील त्याची बॅट ही ४ फूट लांब दाखवली गेलीये. प्रसिद्ध शिल्प कलाकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारला आहे.

प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारताना नेमकी कोणती पोझ निवडायची यावर बराच विचार केला शेवटी ही पोझ फिक्स केली. या पुतळ्यामध्ये सचिनची पोझ सिक्स मारतानाची आहे.

सचिन याचे अनेक ट्रेड मार्क शॉट आहेत. मात्र सचिनने पोझमधील सिक्सर हा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न याला मारला होता.

दरम्यान, या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीसीसीआय सचिन जय शहा, शरद पवार, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, राजीव शुक्ला उपस्थित होते.