AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, रामलीला मैदानावर भव्य जनसागर

दिल्लीच्या रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आज (16 फेब्रुवारी) सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत

केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, रामलीला मैदानावर भव्य जनसागर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Feb 16, 2020 | 8:27 AM
Share

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज (16 फेब्रुवारी) सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची  शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी होत आहे (Kejriwal Oath Taking Ceremony). या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदान आणि परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केजरीवालांचा शपथविधी सोहळा सकाळी 10 वाजताच्या सुमारास सुरु होणार असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली (Kejriwal Oath Taking Ceremony).

केजरीवालांच्या शपथविधी  सोहळ्यासाठी दिल्ली पोलीस, सीआरपीएफसह निमलष्करी दलातील 2,000 ते 3,000 जवान तैनात असतील. या दरम्यान ड्रोनच्या मदतीने सर्व कार्यक्रमावर नजर ठेवली जाईल, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली

केजरीवालांसोबत व्यासपीठावर कोण?

दिल्लीच्या जडणघडणीत हातभार लावणारे विविध क्षेत्रातील 50 जण केजरीवाल यांच्यासोबत मंचावर असतील. यामध्ये शिक्षक, बस मार्शल, सिग्नेचर ब्रिजचे आर्किटेक्ट आणि शहीद झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या कुटुंबांचा समावेश आहे, अशी माहिती आपचे नेता मनिष सिसोदिया यांनी दिली.

मोदींनाही निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही केजरीवालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. आपने आधीच सांगितले होते की, मुख्यमंत्री किंवा इतर राज्यातील राजकीय नेते या कार्यक्रमात सहभाग घेणार नाहीत. कारण हा ‘दिल्लीकेंद्रित’ कार्यक्रम असेल.

‘छोट्या मफलरमॅन’लाही निमंत्रण

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी ग्रहण सोहळ्यात दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावेळी आपच्या कार्यायल परिसरात आपल्या वडिलांसोबत केजरीवालांच्या गेटअपमध्ये एक छोटा मफरमॅन पोहोचला होता. या छोट्या केजरीवाल म्हणजेच एक वर्षाच्या अव्यान तोमरलाही या सोहळ्याचं खास निमंत्रण आहे.

शपथवुधी सोहळ्याला एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता

शपथविधी सोहळ्यासाठी रविवारी रामलीला मैदानावर तब्बल एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असा दावा आपकडून करण्यात आला आहे. “सुमारे एक लाख लोक या सोहळ्याला पोहोचण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिक गेट क्रमांक 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या सहा प्रवेशद्वारातून रामलीला मैदानात प्रवेश करु शकतील”, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...