AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम आदमी पक्ष पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात, 8 उमेदवार जाहीर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) शंख वाजल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

आम आदमी पक्ष पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात, 8 उमेदवार जाहीर
| Updated on: Sep 23, 2019 | 8:46 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) शंख वाजल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आपने (AAP) आपली पहिली यादी जाहीर केली. आपचे महाराष्ट्र सहप्रभारी किशोर मधन (Kishor Madhan), आपच्या महाराष्ट्र संयोजिका प्रीती मेमन (Priti Menan), सचिव धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन 8 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

आपची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 8 उमेदवारांची यादी

1. पारोमिता गोस्वामी – ब्रह्मपुरी विधानसभा 2. विठ्ठल गोविंदा – जोगेश्वरी पूर्व 3. आनंद गुरव – करवीर विधानसभा (कोल्हापूर) 4. विशाल वडघुले – नांदगाव (नाशिक) 5. डॉ. अभिजीत मोरे – कोथरूड विधानसभा (पुणे) 6. सिराज खान – चांदोली विधानसभा (मुंबई) 7. दिलीप तावडे – दिंडोशी विधानसभा (मुंबई उपनगर) 8. संदीप सोनवणे – पर्वती विधानसभा (पुणे)

‘आप महाराष्ट्रात 50 जागा लढवणार’

आपच्या महाराष्ट्र संयोजक प्रीती मेनन यांनी आप महाराष्ट्रात 50 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. मेनन म्हणाल्या, “विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्रातून 600 ते 700 अर्ज आले होते. मागील 10 दिवसात आम्ही 600 उमेदवारांचे अर्ज घेतले. अंतिमतः या सर्व अर्जांची तपासणी आणि अभ्यास करुन यादी तयार करण्यात आली आहे. आप महाराष्ट्रात 50 ते 55 जागा लढवणार आहे.”

‘वंचित सोबत बोलणी सुरू’

आपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत बोलणी सुरू असल्याचंही नमूद केलं. मेनन म्हणाल्या, “वंचितचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यामुळे जर चांगले लोक राजकारणात येत असतील, तर त्यांच्यासोबत जायला काहीच हरकत नाही. म्हणूनच आम्ही वंचित सोबत जाऊ. वंचितसोबत गेल्यास कोणत्या जागा कुठे सोडायच्या यावर चर्चा सुरू आहे. वंचित आमच्यासोबत येत असेल, तर आम्ही तयार आहोत.”

आपची लढाई सामान्य (आम) लोकांसाठी आहे. लोकांच्या समस्या विधानभवनात पोहोचल्या नाहीत. हे सर्व पक्ष एक आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात लढत आहोत. जनतेचा आवाज, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘आप’ ही निवडणूक लढेल, असंही मेनन यांनी सांगितलं.

मेनन म्हणाल्या, “आमच्या पक्षात कुणी राजकारणी नाही. सर्वजण सर्वसामान्य आहेत. सर्वसामान्यांचा आवाज दबलेला आहे. त्याविरोधात आम्ही लढू. शहरातील महत्वाचे मुद्दे आम्ही हातात घेऊ. मुंबईतील आरेच्या विषयावर आम्ही रस्त्यावर लढू.”

Follow Us
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.