AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील तटकरेंची कन्या अदिती तटकरेंविरोधात शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांचा शड्डू

अदिती तटकरे यांच्या समोर शिवसेनेचा उमेदवार कोण हे स्पष्ट होत नसल्यामुळे निवडणूक एकतर्फी होण्याची भीती शिवसैनिकांना होती. मात्र विनोद घोसाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेत नवचैतन्य आलं.

सुनील तटकरेंची कन्या अदिती तटकरेंविरोधात शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांचा शड्डू
| Updated on: Oct 01, 2019 | 10:32 AM
Share

रायगड : श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे, तर राष्ट्रवादीकडून खासदार सुनिल तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांचं नाव निश्चित आहे. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये तटकरे विरुद्ध घोसाळकर (Aditi Tatkare Vs Vinod Ghosalkar) सामना रंगणार आहे.

शिवसेनेकडून रविवारी उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. दुसरीकडे, अदिती तटकरे यांच्या वतीने सोशल मीडियावर प्रचाराची मोहीम उघडण्यात आली आहे. त्यामुळे घोसाळकर आणि तटकरे यांच्यात रंगतदार निवडणूक होईल.

2014 मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर श्रीवर्धनच्या आमदारपदी निवडून आलेल्या अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये तटकरे विरुद्ध तटकरे अशी लढत होण्याची चिन्हं होती. अवधूत तटकरेंना उमेदवारी जाहीर झाली असती तर श्रीवर्धन मतदार संघात तटकरे कुटुंबाविरोधात काम करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अडचण झाली असती. परंतु घोसाळकरांना तिकीट मिळाल्यामुळे चुलत भावंडांमधला संघर्ष टळला आहे.

उद्धव ठाकरेंनी समोरासमोर बसवून आम्हा दोघांना तिकीटावर निर्णय घेण्यास सांगितलं : दिलीप माने

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांना 38 हजारांची मोठी लीड मिळाली होती. तटकरे खासदारपदी निवडून आल्यामुळे शिवसैनिक नाराज होते. त्यातच अदिती तटकरे यांच्या समोर शिवसेनेचा उमेदवार कोण हे स्पष्ट होत नसल्यामुळे निवडणूक एकतर्फी होण्याची भीती शिवसैनिकांना होती. मात्र विनोद घोसाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने (Aditi Tatkare Vs Vinod Ghosalkar) शिवसेनेत नवचैतन्य आलं.

कोण आहेत विनोद घोसाळकर?

विनोद घोसाळकर हे 2009 मध्ये मुंबईतील दहिसर मतदारसंघातून आमदार होते. त्यानंतर शिवसेना उपनेतेपदी त्यांची वर्णी लागली. 2014 मधील निवडणुकीत मात्र भाजपच्या मनिषा चौधरी यांनी विनोद घोसाळकर यांना पराभवाची धूळ चारली होती. घोसाळकरांवर शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, मात्र पुराव्यांअभावी अखेर त्यांची सुटका झाली. नंतर त्यांच्याकडे शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

कोण आहेत अदिती तटकरे?

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे. त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.