AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचा जालन्यानंतर आता उस्मानाबादचा तिढा, सहसंपर्कप्रमुखानेच दंड थोपटले

मुंबई : जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आग्रही आहेत. युतीत ही जागा भाजपकडे असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता उस्मानाबादचाही तिढा वाढलाय. कारण, विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड हे नेहमीच नॉट रिचेबल असतात असा आरोप करत सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांनी दंड थोपटले आहेत. ‘मातोश्री’वर येऊन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव […]

शिवसेनेचा जालन्यानंतर आता उस्मानाबादचा तिढा, सहसंपर्कप्रमुखानेच दंड थोपटले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई : जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आग्रही आहेत. युतीत ही जागा भाजपकडे असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता उस्मानाबादचाही तिढा वाढलाय. कारण, विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड हे नेहमीच नॉट रिचेबल असतात असा आरोप करत सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांनी दंड थोपटले आहेत. ‘मातोश्री’वर येऊन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर स्वतःची बाजू मांडली.

उस्मानाबादसाठी सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, खासदार रवींद्र गायकवाड आणि मकरंदराजे निंबाळकर यांच्या नावावर खल सुरू आहे. शिवसेनेतील अजातशत्रू अनिल खोचरे यांचा सर्वपक्षीयांशी असलेला संपर्कामुळे तेही इच्छुक आहेत. शिवसेनेचा 30 वर्षांपासून असलेला एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून खोचरेंना उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे, शिवाय त्यांचे भाजपशीही सौहार्दाचे संबंध आहेत.

गायकवाड यांची प्रतिमा नॉट रिचेबल खासदार म्हणून ‘मातोश्री’वर सांगण्यात आली आहे. मकरंदराजे यांच्या हॉटेलचे बांधकाम नियमबाह्य आहे, त्यामुळे उमेदवारी बाद होऊ शकते. मकरंदराजे पक्षांतर करण्यासाठी ओळखले जातात. ते मूळचे राष्ट्रवादीचे आहेत. तर विद्यमान खासदार यांच्या विरोधात सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी दंड थोपटलेत. पक्षाने आता फक्त घराणेशाहीचा विचार करू नये, नवीन लोकांनाही संधी दिली पाहिजे, अशी मागणी खोचरेंनी केली.

उस्मानाबादचे शिवसेना खासदार संपूर्ण देशाला तेव्हा माहित झाले, जेव्हा त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलाने मारहाण केली होती. यानंतर एअर इंडियाने त्यांना काळ्या यादीतही टाकलं होतं, शिवाय संसदेतही हा मुद्दा गाजला होता. पण मतदारसंघात ते नेहमीच नॉट रिचेबल असतात, असा आरोप केला जातोय. म्हणून उस्मानाबादच्या सहसंपर्कप्रमुखांनीच आता खासदारांची गाऱ्हाणी करत उमेदवारी मागितली आहे.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?