AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुजय विखेंना पक्षात घेण्यास नगरमधील भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध

अहमदनगर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशात अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारण अहमदनगरमधील भाजप कार्यकर्त्यांनी सुजय विखेंच्या भाजपप्रवेशाला जोरदार विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच नगरमधील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. मुंबईत भाजपच्या कार्यालयात राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची […]

सुजय विखेंना पक्षात घेण्यास नगरमधील भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

अहमदनगर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशात अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारण अहमदनगरमधील भाजप कार्यकर्त्यांनी सुजय विखेंच्या भाजपप्रवेशाला जोरदार विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच नगरमधील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

मुंबईत भाजपच्या कार्यालयात राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत अहमदनगरमधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले होते. त्यांनी सुजय विखे यांच्या भाजपप्रवेशाला विरोध केला. यावेळी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या नावाने भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि दिलीप गांधी यांनाच नगरमधून उमेदवारी देण्याची मागणी केली.

सुजय विखे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील उद्या (12 मार्च) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिढा कायम असताना, सुजय विखे पाटील यांच्या राजकीय हालचाली आघाडीसाठी धक्का देणाऱ्या ठरत आहेत. आता सुजय विखेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याने आघाडीला अहमदनगरमध्ये मोठा धक्का बसणार आहे.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे उपाध्यक्षपद आणि दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीही सुजय विखे पाटील यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभा जागेसाठी सुजय विखे इच्छुक आहेत. मात्र, ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने, सुजय विखे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपच्या दिशेने आपला प्रवास सुरु केला आहे.

दक्षिण नगरसाठी सुजय विखे इच्छुक

सुजय विखे पाटील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा आघाडीच्या परंपरेनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला येते आणि राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही.

दक्षिण नगरच्या लोकसभा जागेसाठी राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे आघाडीत ज्या दोन-तीन जागांबाबत अद्याप तिढा आहे, त्यात दक्षिण नगरच्या जागेचा समावेश आहे. किंबहुना, याच जागेवरुन सर्वाधिक तिढा आहे. त्यात थेट विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचीही मोठी गोची झाली आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीही जागा सोडण्यास तयार नाही.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Follow Us
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण