AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाशीममध्ये आघाडी-युतीसमोर अंतर्गत आव्हान, अपक्षही ठरणार अडसर

वाशीम : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आघाडी आणि युतीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आणि नाराज नेते, कार्यकर्त्यांचे मोठे आव्हान असून अपक्ष उमेदवारही त्यांच्यासाठी अडसर ठरणार आहेत. स्वतंत्र वाशीम मतदार संघात 2 वेळा आणि यवतमाळ वाशीम मतदार संघात 2 वेळा अशा सलग 4 वेळा विजयी ठरलेल्या भावना गवळी यांची या […]

वाशीममध्ये आघाडी-युतीसमोर अंतर्गत आव्हान, अपक्षही ठरणार अडसर
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

वाशीम : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आघाडी आणि युतीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आणि नाराज नेते, कार्यकर्त्यांचे मोठे आव्हान असून अपक्ष उमेदवारही त्यांच्यासाठी अडसर ठरणार आहेत.

स्वतंत्र वाशीम मतदार संघात 2 वेळा आणि यवतमाळ वाशीम मतदार संघात 2 वेळा अशा सलग 4 वेळा विजयी ठरलेल्या भावना गवळी यांची या निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी लढत होणार आहे. मराठा, बंजारा आणि मुस्लीम बहुल असलेल्या या मतदारसंघातील जातीय समीकरणे माणिकरावांच्या उमेदवारीने काही प्रमाणात बदलणार आहेत. दुसरीकडे बहुजन वंचित आघाडीकडून प्राध्यापक प्रवीण पवार यांना देण्यात आलेल्या उमेदवारीने मतांचे विभाजन होणार असल्याचा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे.

वाशीम परिसरातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा  प्रश्न असलेल्या अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करणे, कार्यकर्त्यांच्या मदतील उभे राहणे या कार्यशैलीमुळे भावना गवळी यांनी मतदारसंघात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी आहे. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांचाही वाशीम जिल्ह्यासोबत कायम संबंध राहीला आहे. त्यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव असणाऱ्या काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांची प्रचार यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात वाशीम जिल्ह्यातील वाशीम, कारंजा या 2 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले आहेत. मध्यंतरी राज्यपातळीवर भाजप-शिवसेनेमध्ये झालेल्या सुंदोपसुंदीचे काहीसे पडसाद जिल्ह्यातही पहावयास मिळाले. या दोन्ही पक्षात जिल्ह्यात म्हणावे तेवढे सख्य दिसून येत नसून त्यामुळे युतीचा धर्म कशाप्रकारे निभावला जातो यावर निवडणुकीचे बरेचशे चित्र अवलंबून आहे.

काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या उमेदवारीने वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजाच्या मतांचे विभाजन होणार असल्याचे बोलल्या जात आहे. बहुजन वंचित आघाडीकडून प्रा. पवार यांना देण्यात आलेली उमेदवारी ही यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील बहुसंख्येने असलेल्या बंजारा मतांवर लक्ष ठेवून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच बहुसंख्य समाजातील मतांची होणारी विभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासमोर पक्षांतर्गत शीतयुद्धाचे मोठे आव्हान आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग मनापासून दिसून आलेला नाही. त्यामुळे त्यांना सेना व भाजप कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे. भावना गवळी राजकीय डाव खेळत माझी बहुजन वंचित आघाडीसोबत थेट लढत असल्याचे सांगत असल्या, तरी ठाकरे आणि गवळी या दोन्ही उमेदवारांमध्येच सरळ काट्याची लढत होणार असे दिसत आहे. त्यांच्या समोर अपक्ष उमेदवार भाजपचे प्रदेश सरचिटणीस पी. बी. आडे, वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार प्रा. प्रवीण पवार, प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे आणि अपक्ष उमेदवार आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यांचेच आव्हान असल्याचे चित्र आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...