AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, हिवाळी अधिनेशनानंतर शिंदे-भाजप सरकार….. अमोल मिटकरींचा मोठा दावा काय?

मुक्ताईनगर येथील सभेत बोलताना मिटकरी यांनी महाराष्ट्र सरकारच्या लव्ह जिहादविरोधी धोरणांवर टीका केली.

शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, हिवाळी अधिनेशनानंतर शिंदे-भाजप सरकार..... अमोल मिटकरींचा मोठा दावा काय?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 17, 2022 | 9:14 AM
Share

जळगावः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठा दावा केलाय. हिवाळी अधिवेशनानंतर शिंदे-भाजप सरकार कोसळणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना हे पुरते माहिती आहे.. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की सरकार कोसळणार, असं वक्तव्य मिटकरी यांनी केलंय. जळगाव मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतींच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. एवढच नाही तर शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. एकनाथ खडसे स्टेजवर बसलेले असताना मी हे वक्तव्य करतोय, हे सरकार लवकरच पडणार आहे, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.

सोमवारपासून म्हणजे 19 डिसेंबरपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. खरं तर अधिवेशनापूर्वीच शिंदे-भाजप सरकारमधील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित होता. अनेक आमदार प्रतीक्षेत होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर होईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इच्छुकांच्या वाट्याला पुन्हा प्रतीक्षाच आली.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नाराज आमदार बंड करतील, शिंदे-भाजप सरकार कोसळेल, अशी शक्यता महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली होती. अमोल मिटकरी यांनीही हाच धागा पकडत शिंदे सरकार कोसळण्याचं भाकित केलंय. अधिवेशनापूर्वीच काही आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा आहे, असं मिटकरी म्हणाले.

जळगावातील मुक्ताईनगर येथे बोलताना अमोल मिटकरी यांनी गिरीश महाजनांवर आरोप केले. ग्रामविकास मंत्री असल्याने ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायती आहेत, तिथे तिथे तक्रारी करा. मी ग्रामपंचायत रद्द करतो, असे थेट आदेशच महाजनांनी दिले आहेत. त्यामुळे माझे 13 सदस्य अपात्र ठरल्याचा आरोप मिटकरी यांनी केलाय.

सभेत बोलताना मिटकरी यांनी महाराष्ट्र सरकारच्या लव्ह जिहादविरोधी धोरणांवर टीका केली. सरकारने आंतरधर्मिय विवाहांची नोंद घेण्याचे ठरवले आहे. मात्र गल्लीतले लग्न मोजताय, मग दिल्लीतल्या लग्नांचं काय असा सवाल मिटकरी यांनी केला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांच्या पत्नीचे नाव रेणू शर्मा कसे? गौरी खान आमिर खान यांचाही लव्ह जिहादच म्हणायचा का? सैफ अली खान करीना कपूर यांचाही लव्ह जिहाद आहे का, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा