AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नावातच U आणि T असल्यामुळे हे सरकार युटर्न घेणारच, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

या सरकारनं कसंबसं एक वर्ष पूर्ण केलं. महाभकास असं हे एक वर्ष आहे. सर्व आघाडीवर हे अपयशी सरकार झालं आहे अशा शब्दात भातखळकरांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

नावातच U आणि T असल्यामुळे हे सरकार युटर्न घेणारच, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
| Edited By: | Updated on: Nov 30, 2020 | 5:03 PM
Share

ठाणे : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) वर्षपुर्तीमुळे राजकीय वर्तुळात विरोधक आणि सत्ताधारी असा शाब्दिक सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारनं कसंबसं एक वर्ष पूर्ण केलं. महाभकास असं हे एक वर्ष आहे. सर्व आघाडीवर हे अपयशी सरकार झालं आहे अशा शब्दात भातखळकरांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मराठा आरक्षण, कोरोनाचं संकट असेल सगळ्यात सरकार अपयशी ठरल्याचं भातखळकर म्हणाले. (Atul Bhatkhalkar criticized on cm Uddhav Thackeray in press conference)

इतकंच नाही तर यावेळी भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवरही घणाघाती टीका केली आहे. नावातच यु आणि टी असल्यामुळे हे यु टर्न घेत आहेत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आता शिवसेना अजानची स्पर्धा भरवत आहे. हा एक यु टर्न आहे. विकास कामाला स्थगिती देणं किंवा खेळ खंडोबा करणं हे या महाभकास सरकारचं काम असल्याचं असल्याचं भातखळकरांनी म्हटलं.

‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक विक्रम केले’ या पत्रकार परिषदेमध्ये भातखळकरांनी मुख्यमं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले पण तिथे तीर्थ न घेणारे आणि मूर्तीला हात न लावणारे हे मुख्यमंत्री आहेत. इतकंच नाही तर 8 महिने हे मंत्रालयातच गेले नाहीत असे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा एक विशेष नागरी सत्कार करावा अशा शब्दात भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांनी चिमटे काढले आहेत.

यावेळी भातखळकरांनी कोरोना ते मराठा आरक्षण अशा मुद्दयावर सरकारवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्र हा कोरोनाचा केपीटल आहे आणि मृत्यूही सर्वात जास्त आहे. कोरोनाच्या काळात या ठाणे महापालिकाने 600 रुपये सुद्धा प्रत्येक व्यक्ती मागे खर्च करण्यात औदार्य केलं नाही. आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी सरकारची गत असून मदत ही शासनाची आणि वाटताना स्वतःच्या आणि पक्षाच्या नांवावर वाटली जात असल्याचं त्यांनी म्हटलं.

तर या सरकारची नियत साफ नाही. मराठा आरक्षण टिकावं ही या सरकारची इच्छाच नाही. ज्या बेंचने स्टे दिला आहे त्याच बेंचकडे जाऊ नये एवढं तर शाळकरी मुलालाही कळत पण यांना तेवढं ही समजलं नाही. आरक्षण देण्याची यांची नियतच नाही असा थेट आरपो यावेळी भातखळकरांनी केला. त्यांच्या या कठोर टीकेला आता शिवसेना उत्तर देणारं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. (Atul Bhatkhalkar criticized on cm Uddhav Thackeray in press conference)

इतर बातम्या –

कांदिवलीत वाढीव वीजबिलाची होळी, रास्तारोको, पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट; भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री घरी बसलेले असतील तर राज्य धोक्याच्या वळणावरच; अतुल भातखळकरांचा टोला

(Atul Bhatkhalkar criticized on cm Uddhav Thackeray in press conference)

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक