AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ये बंदा लै जोरात, बाळासाहेब थोरात… सेना-भाजपनंतर अवधूत गुप्तेंचं काँग्रेससाठी प्रचारगीत

शिवसेना आणि भाजप यांच्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाठी अवधूत गुप्तेंनी प्रचारगीत तयार केलं आहे.

ये बंदा लै जोरात, बाळासाहेब थोरात... सेना-भाजपनंतर अवधूत गुप्तेंचं काँग्रेससाठी प्रचारगीत
| Updated on: Oct 18, 2019 | 12:30 PM
Share

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जर सर्वाधिक आवाज कोणाचा घुमला असेल, तर तो आहे संगीतकार-गायक अवधूत गुप्ते यांचा. कारण शिवसेना आणि भाजप यांच्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाठी अवधूत गुप्तेंनी प्रचारगीत (Avadhoot Gupte Congress Campaign song) तयार केलं आहे.

एका बाजूला नाशिक-शिर्डी एका बाजूला पुणे-नगर जणू पाचूच्या कोंदणामंदी कोणी हिरा जडावा सुंदर एक गाव आहे टपोरं त्याचं नाव.. संगमनेर

अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या प्रचारगीतात सुरुवातीला बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघाचं वर्णन करण्यात आलं आहे (Avadhoot Gupte Congress Campaign song).

संगमनेरच्या विकासामागे कारण आहे जो ‘हात’ संगमनेरची जनताच म्हणते इस बंदे मे है कुछ बात ये बंदा लै जोरात, बाळासाहेब थोरात

अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत. थोरातांविरोधात शिवसेनेने साहेबराव नवले यांना तिकीट दिलं आहे.

अवधूत गुप्ते यांनी महायुतीतील दोन्ही पक्षांसोबतच आघाडीसाठीही प्रचारगीत गायलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी गाणं गाताना फरक असावा लागतो, असं अवधूत गुप्तेंनी भाजपच्या प्रचारगीताच्या अनावरणावेळी (Avadhoot Gupte Congress Campaign song) सांगितलं होतं.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील फरक लक्षात घ्यावा लागतो. सत्ताधाऱ्यांचं गीत गाताना सॉफ्ट आवाजात गावं लागतं. तर विरोधकांचं गीत गाताना वरच्या पट्टीत गावं लागतं. पक्षाने केलेली कामगिरी लक्षात घेऊन गीत गावं लागतं. सर्व गोष्टी सांभाळणं मोठी कसरत असते’ असं अवधूत गुप्ते यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

‘महायुतीचा एकच निर्धार, पुन्हा आणूया आपलं सरकार’ पुन्हा आणूया महायुती सरकार, पुन्हा आणूया देवेंद्र सरकार, पुन्हा आणूया भाजप सरकार’ असे भाजपच्या प्रचारगीताचे शब्द होते.

शिवसेनेच्या प्रचारगीताची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून होते. पुढे भगवा झेंडा आणि शिवसैनिकांच्या जल्लोषाचे अनेक क्षण यात दाखवण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही या प्रचारगीतात प्रामुख्याने दाखवलं आहे. आदित्य ठाकरेंच्या लाँचिंगसाठीच हे गाणं आणल्याचीही चर्चा आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेनेनंतर भाजपचं प्रचारगीतही अवधूत गुप्तेंच्या आवाजात

शिवसेनेचं नवं प्रचारगीत आंध्रची नक्कल? प्रशांत किशोर समान दुवा

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.