AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या प्रति विधानसभेला भास्कर जाधवांचा आक्षेप, नियम दाखवत म्हणाले, ‘त्यांचा स्पीकर जप्त करा’

विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश दिले.

भाजपच्या प्रति विधानसभेला भास्कर जाधवांचा आक्षेप, नियम दाखवत म्हणाले, 'त्यांचा स्पीकर जप्त करा'
भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 06, 2021 | 12:24 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली. (Bhaskar Jadhav objection to BJP Prati Vidhansabha showing rules said Seize speaker)

काय म्हणाले भास्कर जाधव?

विधानसभेच्या पायरीवर बसण्याचा निश्चित अधिकार आहे, तिथे घोषणाबाजी करण्याच देखील अधिकार आहे परंतु संसदीय कामकाज चालू असताना स्पीकर लावून मोठमोठ्याने घोषणा देणे आणि तश्या प्रकारचा आंदोलन करणं यासाठी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते ती परवानगी भाजपने घेतली आहे का? जर घेतली नसेल तर असं आंदोलन करुच कसं शकतात. त्यांचा स्पीकर ताबडतोब जप्त करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय आपण द्यावेत, अशी मागणी भास्कर जाधव यांनी नरहरी झिरवळ यांनी केली.

भास्कर जाधवांचं आजही नियमांवर बोट!

विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर आपलं म्हणणं मांडण्यासाठी भास्कर जाधव उभे राहिले. यावेळी त्यांनी तीन मुद्दे मांडले.  संसदीय कार्यमंत्र्यांना बोलावून पायऱ्यांवर गदारोळ करणाऱ्यांना भाजप सदस्यांना विधानसभेत बोलवा, अशी मागणी त्यांनी केली. तसंच बेकायदेशीररित्या आंदोलन करणाऱ्या भाजप आमदारांचा स्पीकर जप्त करा, प्रतिविधानसभेसाठी अध्यक्षांची परवानगी घेतली का ते पाहा, नसेल तर संबंधितांवर कारवाई करा, असं ते म्हणाले. तसंच कोरोनामुळे शासनाने अधिवेशनावेळी इतके कडक निर्बंध लावलेले असताना माजी आमदार भाजपच्या प्रति विधानसभेत कसे, असे सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केले.

भाजपची प्रतिविधानसभा

12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. आज सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी घेतला. विधानसभेत किंवा विधान परिषदेत न जाता विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसूनच भाजपने प्रति विधानसभा भरवली. या प्रति विधानसभेच्या अध्यक्षपदावर भाजपाचे वरिष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांना बसवण्यात आलं. तसंच पहिल्यांदा बोलण्याची संधी राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आली. विखे पाटलांनी विविध मुद्द्यांवरून आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी दोन माईक लावून भाजपचं हे सगळं आंदोलन सुरु होतं. याच आंदोलनावर भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांच्या परवानगीशिवाय भाजप आंदोलन करुच कसं शकतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

(Bhaskar Jadhav objection to BJP Prati Vidhansabha showing rules said Seize speaker)

हे ही वाचा :

VIDEO: विरोधकांची विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा, सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला

भाजपचे 12 आमदार निलंबित, नागपुरात पडसाद, बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पुतळे जाळले

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?