AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मोठी घोषणा, 2011 पर्यंतच्या झोपड्या पात्र करणार

आगामी विधानसभेसाठी शिवसेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आज एक मोठी घोषणा करणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मोठी घोषणा, 2011 पर्यंतच्या झोपड्या पात्र करणार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 29, 2019 | 1:20 PM
Share

मुंबई : आगामी विधानसभेसाठी शिवसेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आज एक मोठी घोषणा करणार आहे. यानुसार महापालिका 2011 पर्यंतच्या झोपडीधारक, गाळे धारकांना पात्र करणार आहे. आज दिवसअखेर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेची आज गटनेत्यांची महत्वाची बैठक होत आहे. यात मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या 2011 पर्यंतच्या झोपड्या पात्र करण्याचा निर्णय होईल. या निर्णयामुळे विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या झोपडपट्टी आणि व्यावसायिक गाळे धारकांना दिलासा मिळणार आहे.

शिवसेनेने हा निर्णय घेतल्यास याचा आगामी विधानसभा निवडणुकीत सकारात्मक परिणाम होईल, असा अंदाज शिवसेनेकडून बांधला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकांचे निकालच याचे उत्तर देणार आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारकडून निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही पावलं टाकली आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे सर्वपक्षीयांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

याआधी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला होता. चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, “9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपेल.  2014 मध्ये 15 ऑक्टोबरला मतदान झालं होतं. त्यामुळे यंदा 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल”

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली