AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रश्मी बागल यांना दुसरा धक्का, भाजपच्या माजी आमदाराचा संजयमामा शिंदेंना पाठिंबा

करमाळयातील शिवसेना उमेदवार रश्मी बागल (Jaywantrao Jagtap supports Sanjay Shinde) यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे.

रश्मी बागल यांना दुसरा धक्का, भाजपच्या माजी आमदाराचा संजयमामा शिंदेंना पाठिंबा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 07, 2019 | 12:38 PM
Share

सोलापूर : करमाळयातील शिवसेना उमेदवार रश्मी बागल (Rashmi Bagal) यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. कारण भाजप  नेते आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा (Jaywantrao Jagtap supports Sanjay Shinde)दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जयवंतराव जगतापांनी (Jaywantrao Jagtap supports Sanjay Shinde)  आपला उमेदवारी अर्ज मागे घेत, संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्याने, संजय शिंदे यांचं पारडं काहीसं जड झालं आहे.

शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज नारायण पाटील यांनी सेनेचा राजीनामा देऊन, अपक्ष उमेदवारी दाखल केली. रश्मी बागल यांच्यापुढे आधीच नारायण पाटील यांचं आव्हान असताना, आता संजयमामा शिंदे यांना जयवंतराव जगतापांनी पाठिंबा दिल्याने, रश्मी बागल यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झालं आहे.

करमाळ्यात शिवसेनेकडून रश्मी बागल, राष्ट्रवादीकडून संजय पाटील घाटनेकर यांच्यात थेट लढत होत आहे. तर नारायण पाटील आणि संजय शिंदे हे दोन्ही तगडे उमेदवार अपक्ष रिंगणात आहेत.

नारायण पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांना राजीनाम्याचा इशारा देत करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची करून माझी उमेदवारी कापली, असा आरोप शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील (Narayan Patil vs Rashmi Bagal) यांनी केला. शिवसेनेने नारायण पाटील (Narayan Patil vs Rashmi Bagal) यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत.

उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष अर्ज भरला आहे.

संबंधित बातम्या 

नारायण पाटील यांनी शिवबंधन तोडलं, रश्मी बागल यांच्याविरोधात शड्डू ठोकला!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...