AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचा भाजपला धक्का, माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे हिंगणा मतदारसंघातील (Hingna Constituency) माजी आमदार विजय घोडमारे (Ex MLA Vijay Ghodmare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज (14 सप्टेंबर) राष्ट्रवादीत (BJP Leader in NCP) प्रवेश केला.

राष्ट्रवादीचा भाजपला धक्का, माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 14, 2019 | 1:23 PM
Share

नागपूर : भाजपचे हिंगणा मतदारसंघातील (Hingna Constituency) माजी आमदार विजय घोडमारे (Ex MLA Vijay Ghodmare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज (14 सप्टेंबर) राष्ट्रवादीत (BJP Leader in NCP) प्रवेश केला. एकीकडे भाजप-शिवसेना (BJP Shivsena) राष्ट्रवादीच्या आमदारांना पक्षात प्रवेश देत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील काही प्रमाणात भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. विजय घोडमारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतल्याचीही चर्चा होती.

हिंगणा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, मात्र भाजपने तेथे आपला झेंडा रोवला आहे. विजय घोडमारे 2009 मध्ये नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी विजय घोडमारे यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासून घोडमारे नाराज होते.

2019 च्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुन्हा तिकीट न मिळण्याची शक्यता असल्यामुळे नाराज असलेल्या विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केला. यंदाही भाजप पुन्हा विद्यमान आमदार समीर मेघे यांनाच तिकीट देण्याची शक्यता होती.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंगणा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, यासाठी घोडमारे प्रयत्नशील होते. जयंत पाटील यांच्या भेटीत घोडमारेंनी तिकीटासाठी प्रयत्न केल्याचंही बोललं गेलं. मागील 2 निवडणुकांमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रमेश बंग यांना पराभव स्वीकारावा लागत आहे. 2009 मध्ये बंग यांचा घोडमारेंनीच पराभव केला होता.

हिंगणा मतदारसंघाचा इतिहास

2019 च्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना हिंगणा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं ‘फेटरी’ गाव याच विधानसभा मतदारसंघात येतं.

2009 पूर्वी हिंगणामध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बंग यांचा प्रभाव होता. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजय घोडमारे यांनी बंग यांचा अवघ्या 700 मतांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच हिंगणामध्ये कमळ फुललं.

घोडमारेंना डावलून मेघेंना संधी

2014 मध्ये भाजपने तत्कालीन आमदार विजय घोडमारे यांना डावलत भाजपमध्ये आलेल्या आणि नागपूर जिल्ह्यातील राजकारणात प्रभाव असलेल्या मेघे कुटुंबातील समीर मेघे यांना संधी दिली. मोदी लाटेवर स्वार होत समीर मेघे यांनी राष्ट्रवादीच्या रमेश बंग यांचा तब्बल 23 हजार मतांनी पराभव केला. परंतु विजय घोडमारे तेव्हापासून नाराज होते.

भाजपकडून विद्यमान आमदार सागर मेघे पुन्हा इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या समीर मेघे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून विजय घोडमारे यांचं आव्हान उभं केलं जाऊ शकतं.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं