…अन्यथा राज ठाकरेंना पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत, तावडेंची जहरी टीका

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कातून केलेल्या भाषणावर आता भाजपकडून प्रत्युत्तरास सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर अत्यंत जहरी टीका केली आहे. “राहुल गांधी पंतप्रधान हवे का, ते शरद पवारांना विचारा, अन्यथा पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत” असा पलटवार विनोद तावडे यांनी …

…अन्यथा राज ठाकरेंना पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत, तावडेंची जहरी टीका

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कातून केलेल्या भाषणावर आता भाजपकडून प्रत्युत्तरास सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर अत्यंत जहरी टीका केली आहे. “राहुल गांधी पंतप्रधान हवे का, ते शरद पवारांना विचारा, अन्यथा पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत” असा पलटवार विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्यावर केला आहे.

विनोद तावडे काय म्हणाले?

“देश खड्ड्यात घालायला राहुल गांधींना पंतप्रधान करा, म्हणायला तो काय मनसे पक्ष आहे का? आणि राहुल गांधी पंतप्रधान हवे का ते शरद पवारांना विचारा, अन्यथा पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत.” अशी टीका विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर केली. पंतप्रधानपद हा काही खेळ नाही, हा भारत देशाचा प्रश्न आहे, असा टोमणाही तावडेंनी राज ठाकरेंना लगावला.

“संजय निरुपम राज ठाकरे यांना लुक्का म्हणाले होते, आता राज ठाकरे मनसैनिकाना सांगणार, निरुपम यांना मतदान करा. हा मनसैनिकांवर अन्याय आहे.”, असे म्हणत विनोद तावडेंनी मनसैनिकांनाही डिवचण्याचा प्रयत्न केला.

काल राज ठाकरे यांनी विविध उदाहरणं देऊन पंतप्रधा नरेंद्र मोदी आणि केंद्र सराकरची पोलखोल केली. यावरुन विनोद तावडे म्हणाले, “एवढा अभ्यास पक्षासाठी केला असता, तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती.”

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडली!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून मोदी सरकारविरुद्ध रणशिंग फुंकलंय. ज्या व्यक्तीवर विश्वास राहिला नाही, त्याला पुन्हा निवडून देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलंय. माझ्या प्रचाराचा फायदा आघाडीला होईल, तर तो होऊ द्या, असंही राज ठाकरे म्हणाले. शिवाय भाजपच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. कुणी माझा वापर करुन घेईल एवढा मी वेडा नाही, असं ते म्हणाले.

भाजप सरकारविरोधात राज्यात 10 सभा घेणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं. मोदींनी 2014 च्या तुलनेत शब्द बदलले आहेत, नोटाबंदीने चार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे देश संकटात आहे. देश संकटात असताना भूमिका बदलावी लागते, असं म्हणत त्यांनी आघाडीचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *