AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मातोश्री’वरुन कुणी राज ठाकरेंना भेटायला जात नव्हतं, मात्र आता माणिकराव ठाकरेंनाही भेटतात : आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar attack on Sanjay Raut and Shiv Sena) यांनी आज पत्रकार परिषद घेत, शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेवर हल्ला चढवला.

'मातोश्री'वरुन कुणी राज ठाकरेंना भेटायला जात नव्हतं, मात्र आता माणिकराव ठाकरेंनाही भेटतात : आशिष शेलार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Nov 15, 2019 | 11:37 AM
Share

ठाकरे आणि भाजपमध्ये विसंवाद निर्माण करण्याचा राऊतांचा प्रयत्न : आशिष शेलार

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar attack on Sanjay Raut and Shiv Sena) यांनी आज पत्रकार परिषद घेत, शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेवर हल्ला चढवला.  “संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण वय वाढतं तशी परिपक्वता वाढावी, अशी अपेक्षा आहे”, असं म्हणत आशिष शेलार (Ashish Shelar attack on Sanjay Raut and Shiv Sena) यांनी टोला लगावला. संजय राऊतांनी मोदीजींबद्दल प्रेम व्यक्त केलं, त्यांचं प्रेम स्वार्थी की निस्वार्थी हे जनतेला माहित आहे. राजकीय स्वार्थापोटी असत्य पसरवणं महाराष्ट्राला मान्य नाही.  अमित शाह आणि मोदीजी संजय राऊत यांना समजण्यासाठी अजून बराच काळ लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.

अमित शाह यांनी दिलेल्या मुलाखतीत युतीबद्दल सत्य बोलले. आम्ही एकदिलाने एक सुराने बोलतो. मात्र आमच्यात विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठाकरे आणि भाजपमध्ये विसंवाद निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र रोज दृश्य स्वरुपात रोज सकाळी पाहात आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

खऱ्या अर्थाने पाहिलं तर भाजप आणि इतर पक्षाचे नेते ‘मातोश्री’वर आदरपोटी जायचे. मात्र आज सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेचे नेते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकीसाठी जात आहेत. आधी मातोश्रीहून कुणी राज ठाकरे यांना सुद्धा भेटायला जात नव्हतं, मात्र आता माणिकराव ठाकरे यांना भेटायला सुद्धा जात आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद

‘मी पुन्हा येईन’ असं सारखं म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय, तर पुढचे 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. राऊतांनी दररोज पत्रकार परिषद घेण्याचा सिलसिला आपल्या वाढदिवशीही कायम (Sanjay Raut Shivsena CM for 25 years) ठेवला. ‘किमान समान कार्यक्रमा’वर काम सुरु आहे. अद्याप कोणताही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. मात्र फॉर्म्युलाची चिंता कोणीही करु नये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम आहेत. आम्ही 24 तारखेपासून सांगत आहोत. लाख प्रयत्न करा आम्हाला थांबवण्याचा, पण शिवसेनेच्याच नेतृत्वात सत्तास्थापन होईल’ असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...