AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधी बंडाच्या तयारीत

अहमदनगर : लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागल्यापासून महाराष्ट्रात चर्चेत राहिलेल्या दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता नव्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर, त्यांना दक्षिण नगरमधून भाजपकडून उमेदवारीही जाहीर झाली. त्यामुळे याच लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी […]

सुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधी बंडाच्या तयारीत
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

अहमदनगर : लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागल्यापासून महाराष्ट्रात चर्चेत राहिलेल्या दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता नव्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर, त्यांना दक्षिण नगरमधून भाजपकडून उमेदवारीही जाहीर झाली. त्यामुळे याच लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे मात्र नाराज झाले आहेत. केवळ नाराज नव्हे, तर दिलीप गांधी हे बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार दिलीप गांधी यांनी बंड केल्यास, भाजपला आणि पर्यायाने सुजय विखे यांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे.

अहमदनगरमध्ये आज बैठकांचा सिलसिला सुरु राहणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांची आज बैठक होणार आहे. या बैठकांमध्ये दिलीप गांधी यांची राजकीय वाटचाल ठरणार आहे. त्यामुळे आजचा दिवस सुजय विखे आणि भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. दिलीप गांधी यांनी बंडखोरी केल्यास, अहमदनगरमध्ये भाजपला दणका बसेलच, त्याचसोबत नुकतेच भाजपवासी झालेल्या सुजय विखे पाटलांना जोरदरा झटका बसेल.

दुसरीकडे, अहमदनगरमध्येच काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसची, तर मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक होणार आहे. एकंदरीत नगरमध्ये आज राजकीय वातावरण प्रचंड हालचालीचं असेल.

दिलीप गांधी यांचं तिकीट भाजपने कापलं!

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघ राजभर चर्चेत आला आहे. भाजपचे दिलीप गांधी हे विद्यमान खासदार आहेत. गेल्या तीन टर्मपासासून ते खासदार आहेत. गेल्या वेळी ते मोदी लाटेवर स्वार झाले. मात्र यंदा त्यांच्या नौकेला आनेक आडथळ्यांना सामोरं जावं लागलं आणि अखेर त्यांचा पत्ताच कट झाला. सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, त्यांना उमेदवारीही जाहीर झाली आणि पर्यायाने दिलीप गांधी यांना बाजूला सारण्यात आले. त्यामुळे ते प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे.

सुजय विखेंच्या अडचणी वाढल्या!

सुजय विखेंनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करुन तिकीट मिळवल्याने स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. त्यात विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी बंड केल्यास सुजय विखेंना जबर फटका बसेल. शिवाय, दुसरीकडे आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना तिकीट मिळाल्याने, सुजय विखेंना तोडीस तोड विरोधी उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे आधीच सुजय विखेंचा विजय आव्हानात्मक बनला असताना, त्यात दिलीप गांधी यांनी बंड केल्यास, सुजय विखे यांच्या अडचणी दुपटीने वाढतील, हे निश्चित.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...