AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रिपद नाही, पण ‘रिमोट कंट्रोल’, भाजपचा शिवसेनेला नवा पर्याय?

सुकाणू समितीचं अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांना सोपवण्याचा प्रस्ताव भाजपने सेनेसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्रिपद नाही, पण 'रिमोट कंट्रोल', भाजपचा शिवसेनेला नवा पर्याय?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Nov 07, 2019 | 9:44 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या नाही, पण ‘रिमोट कंट्रोल’ सोपवून भाजप शिवसेनेची मनधरणी करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मुख्यमंत्रिपद नाही, परंतु सुकाणू समितीचं अध्यक्षपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवण्याचा प्रस्ताव भाजपने सेनेसमोर (BJP offer to Shivsena) ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून बसलेली आहे. सत्तास्थापनेचा जादुई आकडा गाठण्यात भाजपला अपयश आलेलं आहे. अपक्षांच्या पाठिंब्यानेही भाजपला खुर्ची मिळवण्याची जादू करणं मुश्किल आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढण्यावाचून कोणताच पर्याय भाजपसमोर दिसत नाही.

मुख्यमंत्रिपदासह सर्व पदं आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप ही शिवसेनेची मागणी कायम आहे. मात्र त्यावर उतारा म्हणून सुकाणू समितीचं अध्यक्षपद टेकवून सेनेची बोळवण करण्याचा भाजपचा इरादा आहे. आता भाजपच्या ऑफरला (BJP offer to Shivsena) शिवसेना कशाप्रकारे प्रतिसाद देते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल होता, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना सुकाणू समितीचे सर्वाधिकार मिळण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींकडे यूपीएची जी जबाबदारी आहे, त्याला समकक्ष असं सुकाणू समितीचं अध्यक्षपद मानलं जातं. त्यामुळे मुख्यमंत्रिपद नाही, परंतु सुकाणू समितीचं नेतृत्व सोपवण्याचा पर्याय भाजप सेनेला देण्याची चिन्हं आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’वर सकाळी साडेअकरा वाजता शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांचं मत आजमावून पाहणार आहेत. बैठकीमध्ये शिवसेना पुढील राजकीय वाटचाल ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले आहेत.

दुसरीकडे, साधारण त्याच वेळी चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे भाजपचे ज्येष्ठ नेते राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र आता ही वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आलेली आहे.

शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने ‘वेळ’ बदलली?

शिवसेना बैठकीत काय निर्णय घेते, कोणती रणनीती ठरवते, त्यानुसार भाजप पावलं टाकणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यपालांच्या भेटीची उशिराची वेळ बदलून घेतल्याचं म्हटलं जातं. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषद घेऊन तपशील सांगणार आहेत.

आमदारांची पंचतारांकित सोय

दरम्यान, बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांमध्ये फूट पडू नये यासाठी यासाठी ही पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेदरम्यान अशाचप्रकारे सर्व आमदारांना मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आलं होते. शिवसेना आमदारांचा कोणत्याही इतर पक्षासोबत संपर्क होऊ नये, यासाठी हीच रणनीती शिवसेनेकडून वापरली जात असल्याचं दिसत आहे.

मुनगंटीवार सारखे ‘गोड बातमी’ म्हणतात, कोणी बाळंत होणार आहे का? : सामना

भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने ही पावलं उचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

BJP offer to Shivsena

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा