AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उलटी गंगा वाहण्यास सुरुवात, नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Ahmednagar News : भाजपमधील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नगरमधील अकोले इथं हा 'चमत्कार' घडला आहे.

उलटी गंगा वाहण्यास सुरुवात, नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Dec 22, 2020 | 5:48 PM
Share

अहमदनगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेत  (BJP Shiv Sena) प्रवेश करणाऱ्यांचा लोंढा होता. मात्र हा लोंढा आता उलट दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे. चक्क भाजपमधील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Congress President Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत नगरमधील अकोले इथं हा ‘चमत्कार’ घडला आहे. संगमनेर आणि अकोले इथल्या भाजपा कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरात‌ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (BJP workers enters in Congress at Ahmednagar in presence of Balasaheb Thorat)

“गेल्या काही काळात‌ लोकं गेली. पण त्यांची ‌वाट‌ चुकली, ते ‌परत‌ येत‌ आहेत. सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते” असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक आजी-माजी आमदार, खासदारांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. जिथे आमदार-खासदार फुटले तिथे कार्यकर्तेही आलेच. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला अक्षरश: भगदाड पडलं. आता हळूहळू हे भगदाड बुजवण्यास आता सुरुवात झाली आहे. एकीकडे राष्ट्रवादीने मेगाभरती सुरु केली आहे. तर दुसरीकडे आता काँग्रेसनेही आपली झलक दाखवण्यास सुरुवात केली आहे.

भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लवकरच आमच्याकडे येणार आहेत. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कुणी जाणार नाही असे खोटे दावे करत आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपमधून महाविकास आघाडीत आणि काँग्रेसमध्ये अनेक जण प्रवेश करणार आहेत. काँग्रेस पक्षाचा विचार शाश्वत आहे. तो देशहिताचा आहे. आज भाजप, आरएसएस समाजात भेद निर्माण करून सत्तेवर जात आहेत. त्यांचं काम देशहिताचं नाही.

थोरांताचा केंद्रावर हल्लाबोल

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन सुरु आहे. एक महिना हजारो शेतकरी दिल्लीला वेढा घालून भसले आहेत. केंद्र सरकारला सहानुभूती नाही. केंद्र सरकार अडेलतट्टू आणि क्रूर भूमिका घेत आहे. शेतकरी मूलभूत प्रश्न विचारत आहेत. पण केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही, असं थोरात म्हणाले.

देश नव्याने उभा करावा लागेल

गरीब माणसाला ताकद देणारे कामगार हिताचे कायदे बदलण्याचं काम केलं. काही मूठभर लोकांसाठी कृषी कायदे केले. साठेबाज लोकांसाठी हे कायदे केले. देशहिताचं हे काम नाही. जे चाललंय ते आपल्याला आधी थांबवावे लागेल आणि देश पुन्हा उभा करण्याचं काम करावं लागेल, असं बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.

(BJP workers enters in Congress at Ahmednagar in presence of Balasaheb Thorat)

संबंधित बातम्या  

नागपुरात भाजपला मोठा धक्का, व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?: राऊत

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...