AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेसाठी भाजपचं थीम सॉन्ग लाँच

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत, त्यासोबतच राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारालाही वेग आला आहे. आज भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाची टॅगलाईन आणि थीम सॉन्ग लाँच केलं. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पीयूष गोयल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही टॅगलाईन आणि थीम सॉन्ग लाँच करण्यात आलं. तसेच 2019 च्या लोकसभा […]

लोकसभेसाठी भाजपचं थीम सॉन्ग लाँच
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत, त्यासोबतच राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारालाही वेग आला आहे. आज भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाची टॅगलाईन आणि थीम सॉन्ग लाँच केलं. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पीयूष गोयल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत फिर एक बार मोदी सरकारही टॅगलाईन आणि थीम सॉन्ग लाँच करण्यात आलं. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीचीही माहिती देण्यात आली.

2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपने अबकी बार मोदी सरकार या टॅगलाईनवर निवडणूक लढवली होती. तर यावेळी भाजप फिर एक बार मोदी सरकारया टॅगलाईनसोबत मैदानात उतरली आहे. भाजप तीन संकल्पनेवर काम करत असल्याचं जेटलींनी सांगितलं. पहिली संकल्पना ही काम करणारं सरकार’, दुसरी प्रामाणिक सरकारआणि तिसरी मोठे निर्णय घेणारं सरकारअशा तीन संकल्पनांवर भाजप यावेळी निवडणूक लढवणार आहे.

भाजपच्या प्रचाराबाबत जेटली म्हणाले, आमचा प्रचार अभियान हा आमच्या पाच वर्षांच्या सर्व कामाचं एकत्रीकरण आहे. यामध्ये सरकारच्या यशाबाबत माहिती देण्यात आली आहे. अबकी बार फिर मोदी सरकारही भाजपची नवीन टॅगलाईन आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढाई आणि सामाजिक योजनांवर सरकार लक्ष केंद्रित करणार असल्याचंही जेटलींनी सांगितलं. पाच वर्षांत आमच्या सरकारने एकदाही कर वाढवलेला नाही. आमच्या सरकारमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमचा काम करण्यावर विश्वास आहे, असेही जेटली म्हणाले.

यावेळी जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीकाही केली. ‘केंद्रात मजबूत सरकार बनावं असं त्यांना वाटत नाही. काँग्रेसने 72 वर्षांत काहीही केलेलं नाही. आम्ही पाच वर्षांत खूप कामं केली. काँग्रेसचा जाहीरनामा पाहून आश्चर्य वाटतं. कारण त्यांच्या जाहीरनाम्यात मध्यमवर्गीयांसाठी काहीच नाही. आता देशाच्या जनतेलाच ठरवायचे आहे की, त्यांना मजबूत सरकार हवं की मजबूर सरकार‘, असा घणाघात जेटलींनी केला. काँग्रेसनेही आज अब होगा न्याय ही टॅगलाईन प्रसिद्ध केली. तसेच, ही टॅगलाईन असलेले अनेक पोस्टरही प्रसिद्ध केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...