AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री पराभूत

अलिबाग : शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अनंत गीते पराभूत झाले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला. अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 साली विजय मिळवला होता. 2014 साली अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन […]

शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री पराभूत
| Edited By: | Updated on: May 23, 2019 | 3:04 PM
Share

अलिबाग : शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अनंत गीते पराभूत झाले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला.

अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 साली विजय मिळवला होता. 2014 साली अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पराभूत केले होते. त्यावेळी अनंत गीते हे केवळ 2100 मतांनी विजयी झाले होते. यंदा सुनील तटकरे यांनीच अनंत गीते यांना पराभूत करुन, गेल्यावेळीच्या पराभवाचा वचपा काढला.

अनंत गीते हे भाजप्रणित एनडीए सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांच्याकडे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिमंडळात अनंत गीते यांच्या रुपाने केवळ एकच मंत्री होता. अखेर त्यांचाही पराभव झाला आहे.

अनंत गीते हे अत्यंत निष्ठावान आणि जुने शिवसैनिक मानले जातात. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या अनंत गीते यांना 2014 साली शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपदी विराजमान करण्यात आले. शिवसेनेला केंद्रात एकच मंत्रिपद एनडीएकडून देण्यात आले. त्या मंत्रिपदाची माळ शिवसेनेने अनंत गीते यांच्या गळ्यात घातली होती. शिवसेनेतील विश्वासू चेहरा आणि जबाबदारी शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.

मतदारसंघभाजप/शिवसेनाकाँग्रेस/ राष्ट्रवादीवंचित बहुजन आघाडीविजयी उमेदवार
नंदुरबारहिना गावित (भाजप) के. सी. पाडवी (काँग्रेस)दाजमल गजमल मोरे (VBA)हिना गावित (भाजप)
धुळे सुभाष भामरे (भाजप) कुणाल पाटील (काँग्रेस) सुभाष भामरे
जळगावउन्मेष पाटील (भाजप)गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)अंजली रत्नाकर बाविस्कर (VBA)उन्मेष पाटील (भाजप)
रावेररक्षा खडसे (भाजप) उल्हास पाटील (काँग्रेस)नितीन कांडेलकर (VBA)रक्षा खडसे (भाजप)
बुलडाणाप्रतापराव जाधव (शिवसेना)राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)बळीराम सिरस्कार (VBA)प्रतापराव जाधव (शिवसेना) आघाडी
अकोलासंजय धोत्रे (भाजप) हिदायत पटेल (काँग्रेस)प्रकाश आंबेडकरसंजय धोत्रे (भाजप)
अमरावतीआनंदराव अडसूळ (शिवसेना)नवनीत कौर राणा गुणवंत देवपारे (VBA)नवनीत कौर राणा
वर्धा रामदास तडस (भाजप) चारुलता टोकस (काँग्रेस)धनराज वंजारी (VBA) रामदास तडस (भाजप)
रामटेककृपाल तुमाणे (शिवसेना)किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) किरण रोडगे-पाटनकर (VBA)कृपाल तुमाणे (शिवसेना)
नागपूरनितीन गडकरी (भाजप)नाना पटोले (काँग्रेस)नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदियासुनील मेंढे (भाजप)नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)एन. के. नान्हे (VBA)सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूरअशोक नेते (भाजप) नामदेव उसेंडी (काँग्रेस)डॉ. रमेश गजबे (VBA)अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर हंसराज अहीर (भाजप) सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर (काँग्रेस)अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे (VBA)बाळू धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ - वाशिमभावना गवळी (शिवसेना)माणिकराव ठाकरे (काँग्रेस)प्रो. प्रवीण पवार (VBA)भावना गवळी (शिवसेना)
हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना)सुभाष वानखेडे (काँग्रेस)मोहन राठोड (VBA) हेमंत पाटील (शिवसेना)
नांदेडप्रताप पाटील चिखलीकर (भाजप)अशोक चव्हाण (काँग्रेस) प्रा. यशपाल भिंगे (VBA)प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
परभणीसंजय जाधव (शिवसेना)राजेश विटेकर (राष्ट्रवादी)आलमगीर खान अखिल मोहम्मद खान (VBA)संजय जाधव (शिवसेना)
जालनारावसाहेब दानवे (भाजप) विलास औताडे (काँग्रेस)डॉ. शरदचंद्र वानखेडे (VBA)रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबादचंद्रकांत खैरे (शिवसेना)सुभाष झांबड (काँग्रेस)इम्तियाज जलील (VBA)इम्तियाज जलील (VBA)
दिंडोरीडॉ. भारती पवार (भाजप)धनराज महाले (राष्ट्रवादी)बापू केळू बर्डे (VBA)डॉ. भारती पवार (भाजप)
नाशिकहेमंत गोडसे (शिवसेना)समीर भुजबळ (राष्ट्रवादी)पवन पवार (VBA)हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघरराजेंद्र गावित (शिवसेना)बळीराम जाधव - बहुजन विकास आघाडीसुरेश अर्जुन पाडवी (VBA)राजेंद्र गावित (शिवसेना)
भिवंडीकपिल पाटील (भाजप) सुरेश टावरे (काँग्रेस)डॉ. ए. डी. सावंत (VBA)कपिल पाटील (भाजप)
कल्याणश्रीकांत शिंदे (शिवसेना)बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)श्रीकांत शिंदे (शिवसेना)
ठाणेराजन विचारे (शिवसेना)आनंद परांजपे (राष्ट्रवादी)मल्लिकार्जुन पुजारी (VBA)राजन विचारे (शिवसेना)
मुंबई-उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप) उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)गोपाळ शेट्टी (भाजप)
मुंबई - उत्तर पश्चिमगजानन कीर्तिकर (शिवसेना)संजय निरुपम (काँग्रेस)गजानन कीर्तिकर (शिवसेना)
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)मनोज कोटक (भाजप)संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)संभाजी शिवाजी काशीद (VBA)मनोज कोटक (भाजप)
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप) प्रिया दत्त (काँग्रेस) पूनम महाजन (भाजप)
मुंबई दक्षिण मध्यराहुल शेवाळे (शिवसेना)एकनाथ गायकवाड (काँग्रेस)डॉ. संजय भोसले (VBA)राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबईअरविंद सावंत (शिवसेना)मिलिंद देवरा (काँग्रेस)डॉ. अनिल कुमार (VBA)अरविंद सावंत (शिवसेना)
रायगडअनंत गीते (शिवसेना)सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)सुमन कोळी (VBA) सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
मावळश्रीरंग बारणे (शिवसेना)पार्थ पवार (राष्ट्रवादी)राजाराम पाटील (VBA)श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणेगिरीश बापट (भाजप)मोहन जोशी (काँग्रेस)अनिल जाधव (VBA)गिरीश बापट (भाजप)
बारामतीकांचन कुल (भाजप)सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)नवनाथ पडळकर (VBA)सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर शिवाजीराव आढळराव-पाटील (शिवसेना)अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगरसुजय विखे (भाजप)संग्राम जगताप (राष्ट्रवादी)सुधाकर आव्हाड (VBA)सुजय विखे (भाजप)
शिर्डीसदाशिव लोखंडे (शिवसेना)भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)डॉ. अरुण साबळे (VBA)सदाशिव लोखंडे (शिवसेना) आघाडीवर
बीडडॉ. प्रीतम मुंडे (भाजप) बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) प्रा. विष्णू जाधव (VBA)डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
उस्मानाबादओमराजे निंबाळकर (शिवसेना)राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)अर्जुन सलगर (VBA)ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
लातूरसुधाकरराव श्रंगारे (भाजप) मच्छिलिंद्र कामत (काँग्रेस)राम गारकर (VBA)सुधाकरराव श्रंगारे (भाजप)
सोलापूरजयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)सुशिलकुमार शिंदे (काँग्रेस)प्रकाश आंबेडकर (VBA)जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
माढारणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)संजय शिंदे (राष्ट्रवादी)अ‍ॅड. विजय मोरे (VBA)रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
सांगलीसंजयकाका पाटील (भाजप) विशाल पाटील (स्वाभिमानी)गोपीचंद पडळकर (VBA)संजयकाका पाटील (भाजप)
सातारानरेंद्र पाटील (शिवसेना)उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)सहदेव एवळे (VBA)उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्गविनायक राऊत (शिवसेना)नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)मारुती रामचंद्र जोशी (VBA)विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना)धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) डॉ. अरुणा माळी (VBA)संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगलेधैर्यशील माने (शिवसेना)राजू शेट्टी (स्वाभिमानी)अस्लम बादशाहजी सय्यद (VBA)धैर्यशील माने (शिवसेना)

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात