षंढ, मर्दानगी, रेडे… राऊत जेलमधून ‘ही’ भाषा शिकून आले, भाजप नेत्याचा हल्लाबोल

महाराष्ट्रातल्या जनतेला ही भाषा सहन होणार नाही, अशी टीका भाजप नेत्याने केली आहे.

षंढ, मर्दानगी, रेडे... राऊत जेलमधून 'ही' भाषा शिकून आले, भाजप नेत्याचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 1:31 PM

मुंबईः संजय राऊत (Sanjay Raut) हे तीन महिने जेलमध्ये राहून आले. त्यामुळे ते षंढ, मर्दानगी, रेडे अशा शब्दांची भाषा शिकून आले. कैद्यांची अशा प्रकारची भाषा असते. मात्र महाराष्ट्रातील जनतेला ही भाषा सहन होणार नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न उफाळून आलेला असताना शिंदे-भाजप सरकारने तोंडाला कुलूप लावले आहे. हे षंढ, नामर्द सरकार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी आज केली.

तुमच्यात दम असेल तर केंद्र सरकारला या प्रश्नावर तोडगा काढायला सांगा. मराठी भाषिकांवरील अन्याय आम्ही सहन करणार नाहीत.. परिस्थिती चिघळली तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, ‘ कोणतीही अनुचित घटना देशाला किंवा महाराष्ट्राला परवडणारी नाही. मंत्री गेले नाहीत म्हणून सरकार षंढ आहे, धमक नाही, ही भाषा संजय राऊत यांना शोभत नाही.

मर्दानगी आणि सरकार चालवण्याची धमक शिंदे आणि फडणवीस यांच्यात कशी आहे, हे संजय राऊत यांना माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर सामाजिक वातावरण बिघडवून मिळत नाही. मागच्या अडीच वर्षात तुमचं सरकार होतं तर सीमा प्रश्नात त्यांनी काय भूमिका घेतली? असा सवाल बावनकुळे यांनी केला.

सुप्रीम कोर्टात एखादं प्रकरण असताना, कर्नाटक आणि महाराष्ट्रानीही जनतेकडून भूमिका घेतली आहे. एसटी फोडणे, गाड्या फोडणे ही लोकशाहीची लक्षणे नाहीत.

महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाला विनंती करणार आहे. हा खटला लवकरात लवकर निकालात निघाला पाहिजे, असं पत्र देणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले.

जेलमध्ये गेल्यावर ते आतल्या कैद्यासोबत राहून काही गोष्टी शिकून आलेत. तेथून काही वाक्य मिळतात, ते तेथून घेऊन आलेत.. आमदारांना रेडे म्हणतायत… असा आरोप बावनकुळे यांनी केलाय. महाराष्ट्रातल्या जनतेला ही वाक्ये सहन होत नाहीत.

हनुमान चालिसा मातोश्रीवर म्हणून असं एका महिला खासदाराने म्हणले, पण तुम्ही त्यांना अडवलं. त्यांना काय वागणूक दिली जेलमध्ये? यावरून षंढ कोण आहे, हे कळतं, असं बावनकुळे म्हणाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.