AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून मी तलवार काढण्याची भाषा केली- संभाजीराजे

मी तुळजापुरात गेलो नसतो तर मोठा उद्रेक आणि जाळपोळ झाली असती

...म्हणून मी तलवार काढण्याची भाषा केली- संभाजीराजे
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 09, 2020 | 7:04 PM
Share

सोलापूर: मी केवळ तुळजापुरात संतापलेल्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी वेळ पडल्यास मी तलवार काढेन, असे वक्तव्य केले होते. मात्र, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत समाजात दुही पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. छत्रपती संभाजीराजे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, मी तुळजापुरात संतापलेल्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी वेळप्रसंगी मी तलवार काढेन, असे वक्तव्य केले. मात्र, त्याचा काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी चुकीचा अर्थ काढत समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला. मी तुळजापुरात गेलो नसतो तर मोठा उद्रेक आणि जाळपोळ झाली असती, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

तुळजापुरात आयोजित सकल मराठा समाजाच्या ठोक मोर्च्यात मराठा समाज संतापलेला होता. राजे तुम्ही आम्हाला म्यानातून तलवारी काढण्याची परवानगी द्या, असा जनतेतून आक्रोश होता. या सगळ्याला आक्रमक वळण मिळू नये म्हणून मी जमावाला शांत करण्यासाठी तुम्हाला तलवार काढण्याची गरज नाही ,वेळप्रसंगी मी तलवार काढेन, असे म्हटले. मात्र, त्याचा विपर्यास करण्यात आला, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार? राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार? का समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये. ओबीसीविरोधात, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी? मराठा समाजासह कोणत्याही समाजाचे नुकसान होता कामा नये. म्हणून राजेंना सांगतोय मध्य मार्ग काढता येतो का बघा, अशी भूमिकाही विजय वडेट्टीवार यांनी मांडली होती.

Follow Us
भुजबळांसह 3 मंत्र्यांचा ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून बहिष्कार
OBC Reservation | ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठा राडा! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून बहिष्कार; निधीवरून सरकारला घेरलं
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
हागाईचा भडका कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं
Supriya Sule | सण तोंडावर, महागाईचा भडका! कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं...
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं विधान चर्चेत
पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ वरून वाद पेटला! डीजे बंद करा, अन्यथा...
Pune Ganeshotsav 2026 | पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ वरून वाद पेटला! डीजे बंद करा, अन्यथा मोठं आंदोलन उभारू
CSMT बाहेर महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्ते आक्रमक
CSMT स्थानकाबाहेर महागाईविरोधात सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी नेत्यांचे आंदोलन
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचं...
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचे मोठं विधान, काय म्हणाले?
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा परवाना निलंबित
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक