AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Udhav Thackrey: पहाटेचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर, मलिक-देशमुखांचा हवाला देत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खिंडीत गाठलं

बाळासाहेबांना काय उत्तर देणार. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं ते तरी काय उत्तर देणार. देशात सर्व सांगत होते हे नको हे नको. तेव्हा बाळासाहेब म्हणाले हे रादू द्या काय उत्तर देणार. 2006 साली मी हिंदू होतो, आजही आहे. तुरुंगात टाकणार असाल तर मी सर्वांची जबाबदारी घेतो, माझ्या शिवसैनिकांचीही घेतो, टाका मला तुरुंगात.

CM Udhav Thackrey: पहाटेचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर, मलिक-देशमुखांचा हवाला देत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खिंडीत गाठलं
Udhav thackreyImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 25, 2022 | 5:07 PM
Share

मुंबई : सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक (Nawab Malik) आणि देशमुखांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही. आम्ही तुमच्या गळ्यात पट्टा बांधवला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहात ही नीच विकृत आणि निंदनीय गोष्ट आहे. मर्द असेल तर अंगावर ये, बघतो तू आहे आणि मी आहे. आता कळत नाही शिखंडी कोण आणि मर्द कोण. याला मर्दपणा म्हणत नाही. घराघरातील कुटुंबाला बदनाम करायचा. धाडी टाकायच्या. मागे गडकरी म्हणाले आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. तुमच्याकडे ह्युमन लॉन्ड्रिंग सुरू केलंय का. म्हैसूर साबण लावायचा बघा झाला स्वच्छ, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा समाचार घेतला आहे. (Chief Minister Uddhav Thackeray’s reply to Leader of Opposition Devendra Fadnavis)

हा महाराष्ट्र आहे, धृतराष्ट्र नाही

हे सर्व होतंय असं समजू नका की कोण बघत नाही. आपला पिता धृतराष्ट्र होता. तसा हा धृतराष्ट नाहीये. हा महाराष्ट्र आहे. याच्या वाटेला जाऊ नका. यातून कोणाचं भलं होत नाही. मी घाबरलोय म्हणून मी बोलत नाही. ही संधी आहे. इथे अनेकांना यायचं असतं पण येता येत नाही. मतभेद असेल सांगा. सूचना सांगा, आमच्यात गुन्हेगार असेल तर सांगा. तुम्हाला सत्ता पाहिजेच ना. सगळ्यांच्या समोर सांगतो. पेनड्राईव्ह गोळा करू नका. ज्यांना पाहिजे त्यांना. मी तुमच्यासोबत येतो. सत्तेसाठी येत नाही. तुम्ही जे चाळे केले आहेत. कुटुंबीयांची बदनामी करायची. याच्यावर टाच मार त्याच्यावर टाच मार, मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात. मी तुमच्या कुटुंबाच्या कधी भानगडी काढल्या. याचं शेपूट त्याला त्याचे शेपूट त्याला जोडलं जातं. एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात. मी थोडसं भावनिक बोलतो. बाबरीच्या खाली राम जन्मभूमी होती. तसे कृष्णजन्मभूीच्या तुरुंगात टाका. मी कृष्ण नाही. मी जसं सांगतो तसं तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्ही कंस नाही.

…तर मी सर्वांची जबाबदारी घेतो

बाळासाहेबांना काय उत्तर देणार. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं ते तरी काय उत्तर देणार. देशात सर्व सांगत होते हे नको हे नको. तेव्हा बाळासाहेब म्हणाले हे रादू द्या काय उत्तर देणार. 2006 साली मी हिंदू होतो, आजही आहे. तुरुंगात टाकणार असाल तर मी सर्वांची जबाबदारी घेतो, माझ्या शिवसैनिकांचीही घेतो, टाका मला तुरुंगात. ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली त्यांचा छळ कशासाठी ? असा सवालीही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. (Chief Minister Uddhav Thackeray’s reply to Leader of Opposition Devendra Fadnavis)

इतर बातम्या

CM Uddhav Thackeray : तुम्हाला सत्ताच हवीय ना, मी तुमच्यासोबत येतो, टाका मला तुरुंगात, उद्धव ठाकरेंचं भाजपला खुल्लं आव्हान

Udhav Thackrey on ED : ईडी आहे की घरगडी, देवेंद्रजी तुम्हाला केंद्रानं घेतलं पाहिजे, फडणवीसांच्या आरोपांवर सीएम सुसाट

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली