Maharashtra politics : कंपाऊंडरला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची वेळ आली; संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. कंपाऊंडरची ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये रवानगी करण्याची वेळ आली असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Maharashtra politics : कंपाऊंडरला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची वेळ आली; संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
चित्रा वाघ Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 10:49 AM

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी (Shiv Sena) बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळाणारे आमदारांचे समर्थन वाढत असून, एकएक आमदार शिवसेनेच्या गोटातून एकनाथ शिंदे गटात सहभागी होत आहे. त्यामुळे आता शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी दहीसरमध्ये झालेल्या मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. कामाख्या देवीसाठी 40 रेडे पाठवले आहेत, त्यांचे बळी द्या, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. तसेच या आमदारांनी मुंबईत येऊन दाखवावे असे आव्हान देखील त्यांनी केले आहे. आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘कंपाऊंडरची ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये रवानगी करण्याची वेळ आली’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

 सुप्रिया सुळेंवरही निशाणा

दरम्यान यापूर्वी देखील या सर्व घडामोडींवरून चित्रा वाघ यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याच्या झमेल्यात सर्वज्ञानी संपादकांनी पडू नये, कर्माची फळे भोगताना “सुख मानण्यावर आहे”  या मुख्यमंत्र्यांच्या उपदेशाचे स्मरण करावे आणि आनंदात रहावे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. तसेच तुमचा पक्ष शिवसेनेच्या आमदारांना मतदारसंघात काम करूच देत नाही, म्हणून तर ते आसामला गेले आहेत. आसामहून परत आले की त्यांची मतदारसंघातील कामे नक्की होतील. त्याची खात्री पटल्याशिवाय ते आसामहून येणारच नाहीत असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रीया सुळे यांना देखील टोला लगावला होता.

काय म्हणाले होते संजय राऊत

सुरुवातीला शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यात आली. मात्र आमदार काही परतत नसल्याचे लक्षात येताच आता शिवसेनेकडून देखील आक्रमक भूमिका घेतली जात आहे. रविवारी शिवसेनेच्या वतीने दहीसरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. कामाख्या देवीसाठी 40 रेडे पाठवले आहेत, त्यांचे बळी द्या, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. तसेच जर या आमदारांमध्ये धमक असेल तर त्यांनी आमदाराकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे, असे आव्हान देखील राऊत यांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.