AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानभवनातील मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय ठरलं? उद्धव ठाकरे म्हणतात…

युतीमध्ये विविध नेत्यांच्या वक्तव्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. केवळ अर्धा तास चाललेल्या या बैठकीत काय ठरलं असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला, 'पत्रकारांना काहीही बोलायचं नाही', असं या बैठकीत ठरल्याचं उद्धव ठाकरेंनी मिश्कीलपणे सांगितलं.

विधानभवनातील मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय ठरलं? उद्धव ठाकरे म्हणतात...
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 24, 2019 | 6:25 PM
Share

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विधानभवनात बैठक झाली. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांचीही बैठकीला उपस्थिती होती. युतीमध्ये विविध नेत्यांच्या वक्तव्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. केवळ अर्धा तास चाललेल्या या बैठकीत काय ठरलं असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला, ‘पत्रकारांना काहीही बोलायचं नाही’, असं या बैठकीत ठरल्याचं उद्धव ठाकरेंनी मिश्कीलपणे सांगितलं.

शिवसेना आणि भाजप युतीने लोकसभेत घवघवीत यश मिळवलं असलं तरी विधानसभेपूर्वी जागा वाटपाचा मुद्दा असो, किंवा मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा, यावरुन विविध नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत आमदारांची बैठक घेतली.

दरम्यान, शिवसेना-भाजप युती, जागावाटप आणि मुख्यमंत्री पद याबाबत जो कुणी गैरसमज पसरवेल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा निर्णय उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी घेतल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि माझं बोलणं झालंय. त्यामुळे कुणीही मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता युतीमध्ये जो कोणी मिठाचा खडा टाकेल त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे. याबाबत उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात फोनवर चर्चा झाली. त्यावेळी शिवसेना आणि भाजप युती, जागावाटप आणि मुख्यमंत्री पद याबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

VIDEO :

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...