AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप जाहीर, बाळासाहेब थोरातांकडे महसूल तर अजित पवारांना अर्थ खातं

ठाकरे मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे.

ठाकरे मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप जाहीर, बाळासाहेब थोरातांकडे महसूल तर अजित पवारांना अर्थ खातं
Anish Bendre
Anish Bendre | Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jan 05, 2020 | 4:09 PM
Share

मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली. त्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची खाती जाहीर (Thackeray Government Portfolio Announced) करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या खातेवाटपाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. (Thackeray Government Portfolio Announced).

30 डिसेंबरला ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मंत्रिपदं मिळाली आहेत. आधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोन मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला 16, शिवसेनेला 14 आणि काँग्रेसला 12 अशी मंत्रिपदं आहेत.

राष्ट्रवादी 16 (12 + 04)

अजित पवार (उपमुख्यमंत्री) : वित्त, नियोजन जयंत पाटील : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास छगन भुजबळ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीप वळसे पाटील : कामगार, राज्य उत्पादन शुल्क धनंजय मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अनिल देशमुख : गृह हसन मुश्रीफ  : ग्राम विकास राजेंद्र शिंगणे : अन्न व औषध प्रशासन नवाब मलिक : अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता राजेश टोपे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण जितेंद्र आव्हाड : गृहनिर्माण बाळासाहेब पाटील : सहकार, पणन

राष्ट्रवादी – राज्यमंत्री

दत्तात्रय भरणे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

आदिती तटकरे : उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

संजय बनसोडे : पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

प्राजक्त तनपुरे : नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

———–

शिवसेना 14 (10 + 04)

सुभाष देसाई : उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा एकनाथ शिंदे : नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) संजय राठोड : वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन गुलाबराव पाटील : पाणी पुरवठा व स्वच्छता दादा भुसे : कृषि, माजी सैनिक कल्याण संदीपान भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन अनिल परब : परिवहन, संसदीय कार्य उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण आदित्य ठाकरे : पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) : मृद व जलसंधारण

शिवसेना – राज्यमंत्री

अब्दुल सत्तार : महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

शंभूराज देसाई : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

बच्चू कडू (प्रहार जनशक्ती) : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

राजेंद्र येड्रावकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

—————

काँग्रेस 12 (10 + 02)

बाळासाहेब थोरात : महसूल नितीन राऊत : उर्जा अशोक चव्हाण : सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) के सी पाडवी : आदिवासी विकास विजय वडेट्टीवार : इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन अमित देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य सुनिल केदार : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण यशोमती ठाकूर : महिला व बालविकास वर्षा गायकवाड : शालेय शिक्षण अस्लम शेख : वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

काँग्रेस – राज्यमंत्री

सतेज पाटील : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

डॉ. विश्वजीत कदम :  सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

संबंधित बातम्या : 

गाडी सुरु होताना धक्के खाते, एकदा सुटली की सुसाट जाते : संजय राऊत

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...