AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करुन देऊ, मी मुंबईचा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

महापालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करून देणार मी मुंबईचा मुख्यमंत्री, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले.

महापालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करुन देऊ, मी मुंबईचा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jan 26, 2020 | 5:50 PM
Share

मुंबई : महापालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करून देणार मी मुंबईचा मुख्यमंत्री, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांनी एकच जल्लोष केला. आज (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. तसेच वीर जिजामाता प्राणी संग्रहालयाचेही उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) उपस्थितांशी संवाद साधला.

“मुंबई महापालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करून देणार मी मुंबईचा मुख्यमंत्री आहे. आजपर्यंत सोहळा टीव्हीवर पाहत होतो. पण तुमच्यामुळे शिवाजी पार्कवर ध्वजारोहण करता आले. पूर्वीच्या सुविधा कमी पडत असल्याने नव्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था भक्कम करतोय आणि आता तर सरकार आपल्याकडं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईतील महत्त्वाच्या लोअर परळ पुलाचं भूमीपूजन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या लोअर परळच्या पुलाचं काम अखेर सुरू होतं आहे. त्याशिवाय संत गाडगे महाराज चौक सातरस्ता या ठिकाणी दोन पुलांचंही भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.

केशवराव खाड्ये मार्गावर हाजी अलीच्‍या दिशेने जाणाऱ्या आणि संत गाडगे महाराज चौक सातरस्ता इथून धोबी घाटमार्गे डॉ. ई. मोजेस मार्ग येथे म्हणजे वरळी नाका दिशेनेदेखील पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आधुनिक प्रदर्शन कक्षाचे लोकार्पण केले आणि भक्तीपार्क उद्यान येथील मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा शुभारंभ केला.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...