AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातकणंगलेत काँग्रेसमधून बंडखोरी, माजी मंत्र्याचा मुलगा अपक्ष लढण्याच्या तयारीत

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. हातकणंगले मतदारसंघातून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवडे येत्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसने तिकीट नाही दिलं तर अपक्ष लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. सांगलीतली बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरु असतानाच हातकणंगलेत पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे. हातकणंगले लोकसभा […]

हातकणंगलेत काँग्रेसमधून बंडखोरी, माजी मंत्र्याचा मुलगा अपक्ष लढण्याच्या तयारीत
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. हातकणंगले मतदारसंघातून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवडे येत्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसने तिकीट नाही दिलं तर अपक्ष लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. सांगलीतली बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरु असतानाच हातकणंगलेत पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीकडून धैर्यशील माने, काँग्रेस-राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून खासदार राजू शेट्टी लढत आहेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हे लोकसभेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पक्षाने तिकीट न दिल्यास जाहीरपणे बंडखोरी करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.

कार्यकर्त्यांच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं आवाडे यांनी सांगितलंय. सांगलीत दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा यांचे नातू प्रतिक पाटील यांनी तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाला रामराम ठोकलाय. कोल्हापूर जिल्ह्यातही माजी मंत्र्याच्या मुलानेच बंडाचा इशारा दिल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.

राहुल आवाडे यांची मनधरणी करण्यासाठी काही नेत्यांनी त्यांची भेट घेतली. पण राहुल आवाडे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. राजू शेट्टी यांनी आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. राहुल आवाडे हे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू, तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव आहेत. राजू शेट्टी गटाची यामुळे चिंता वाढली आहे.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं